Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सेलिब्रिटी पितात ते 'अल्कलाइन वाटर' काय असतं? सामान्य पाण्यापेक्षा वेगळं असतं का? किंमत जाणून धक्काच बसेल

सेलिब्रिटी पितात ते 'अल्कलाइन वाटर' काय असतं? सामान्य पाण्यापेक्षा वेगळं असतं का? किंमत जाणून धक्काच बसेल
 

आपण सर्वांनीच ब्लॅक वॉटर पाणी किंवा अल्कलाइन वाटर हे नाव ऐकले असेल. जवळजवळ प्रत्येक सेलिब्रिटींच्या हातात या पाण्याची बॉटल आपण पाहिली आहे. अनुष्का शर्मापासून ते मलायका अरोरापर्यंत तसेच विराट कोहली देखील, अनेकांना आपण हे पाणी पिताना पाहिलं असेल. पण कधी विचार केला का की नक्की असं काय फरक असतो या पाण्यात आणि आपल्या साध्या पाण्यात. शिवाय ते पाणी फार महागही असते. त्याची किंमत खूप जास्त असते त्यामुळे ते सामान्य लोकांना रोज पिणे नक्कीच शक्य नाही.

‘अल्कलाइन वाटर’ म्हणजे काय?

‘अल्कलाइन वाटर’ विकणाऱ्या कंपन्या त्यात 70 पेक्षा जास्त खनिजे मिसळून हे पाणी विकण्याचा दावा करतात. या पाण्यात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखी खनिजे असल्याचा दावा केला जातो. या पाण्याची पीएच पातळी सामान्य पाण्यापेक्षा जास्त असते. या पाण्याची पीएच स्केल, जो 0 ते 14 पर्यंत असतो. तर सामान्य पाण्याची पीएच पातळी सामान्यतः 7 असते. ज्यामुळे ते सामान्य पाण्यापेक्षा जास्त क्षारीय बनते. अनेक सेलिब्रिटी आणि आरोग्याविषयी जागरूक लोक ‘अल्कलाइन वाटर’ पितात कारण त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. काहींचा असा विश्वास आहे की हे पाणी शरीरातील आम्लता कमी करू शकते, चांगले हायड्रेशन प्रदान करू शकते आणि हाडांच्या आरोग्यास प्रोत्साहन देऊ शकते.

अल्कलाइन वाटर सामान्य पाण्यापेक्षा वेगळे कसे आहे?
पीएच पातळी : सामान्य पाणी आणि ‘अल्कलाइन वाटर’ यातील सर्वात मोठा फरक म्हणजे पीएच पातळी आहे. सामान्य पाण्याचा पीएच 7 असतो, तर अल्कलाइन वाटरचा पीएच 8 ते 9.5 दरम्यान असतो. त्यामुळे ते शरीराला जास्त फायदे देतं.

खनिजे : अल्कलाइन वाटर पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे जास्त प्रमाणात असू शकतात. ही खनिजे पाण्याची पीएच पातळी संतूलित ठेवतात.

ORP : अल्कलाइन वाटरमध्ये अनेकदा नकारात्मक ऑक्सिडेशन-कमी करण्याची क्षमता असते, ज्यामुळे ते अँटीऑक्सिडंट बनते. याचा अर्थ ते शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सना निकामी करण्यास मदत करू शकते.

चव : अल्कलाइन वाटरची चव ही सामान्य पाण्यापेक्षा थोडीशी गोडसर असते.
अल्कलाइन वाटर पिण्याचे फायदे

अल्कलाइन वाटर प्यायल्याने शरीर लवकर हायड्रेट होण्यास मदत होते. त्यामुळे खेळाडू आणि जीम करणारे, व्यायाम करणारे लोक किंवा सेलिब्रिटी हे पाणी पिण्यास प्राधान्य देतात. तसेच या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बऱ्याच प्रमाणात असतात जी हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरतात.

पाण्याची किंमत:
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की विराट जे अल्कलाइन वाटर पाणी पितो त्याची किंमत 4,000 रुपये प्रति लीटर आहे. होय, विराट, आता किंमतीवरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की हे सामान्य पाणी नाही. त्यात अनेक मिलरेल्स आहेत, त्यामुळे त्याचा रंग काळा आहे. त्याचे हे पाणी फ्रान्स मधून येते अशी महिती मिळते. दरम्यान बाजारात अनेक प्रकारचे अल्कलाइन वाटर ज्यांची किंमत वेगवेगळी असू शकते. बाटलीतील अल्कलाइन पाणी 100 रुपये ते 500 रुपये प्रति लीटरपर्यंत असू शकते, तर घरी अल्कलाइन फिल्टरही लाव शकता. ज्याची किंमत 15,000 रु, ते 30,000 रु किंवा त्याहून अधिक असू शकते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.