उल्हासनगरात नामांकित वकील महिलेने घेतला टोकाचा निर्णय
उल्हासनगर : उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका वकील महिलेने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून जीवन संपवल्याची खळबजनक घटना घडली आहे. त्या वकील महिलेचे नाव सरिता खानचंदानी असे आहे.
त्या उल्हासनगरातील कॅम्प ४ परिसरातील रोमा अपार्टमेंट मध्ये राहत होत्या. त्या हिराली फाउंडेशनच्या अध्यक्ष व एक नावाजलेल्या वकील होत्या. गुरुवारी सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान रोमा अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरील टेरेसवर त्या गेल्या. त्यांनी टेरेसवरील ग्रील वर बसून सर्वप्रथम आकाशाकडे बघून नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणाहून खाली उडी मारली. हा धक्कादायक प्रकार घडताच या घटनेची खबर विठ्ठलवाडी पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्वरित जखमी अवस्थेत पडलेल्या सरिता खानचंदानी यांना जवळच्या बालाजी रुग्णालयात दाखल केले. पण त्यांचे प्रकृती खूपच गंभीर असल्याने उल्हासनगरातील कॅम्प तीन परिसरातील मॅक्सि मॅक्स रुग्णालयात हालवण्यात आले. त्यांचे प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
सरिता खानचंदानी यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी विठ्ठलाची पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सरिता खानचंदानी यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न उल्हासनगरवाशांना पडला आहे.या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ॲड. जय गायकवाड यांनी या घटनेबाबत सांगितले ही घटना अत्यंत दुखद आहे. आम्ही खानचंदानी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. कोणीही असा टोकाचा निर्णय घेऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.