एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे येताना दिसतंय. चक्क एका अभिनेत्रीच्या भावाची पार्किंगच्या वादातून हत्या करण्यात आलीये. स्कूटी पार्किंगवरून वाद झाला आणि थेट हत्या करण्यात आली. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाची हत्या झालीये. दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये पार्किंगवरून हुमाचा भाऊ आसिफ कुरेशीची हत्या करण्यात झाली. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळातच हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केलीये.
मिळालेली अधिक माहिती अशी की, निजामुद्दीनच्या जंगपुरा भोगल बाजार लेनमध्ये गुरुवारी रात्री उशिरा स्कूटी घराच्या गेटवरून काढून बाजूला पार्क करण्यावरून वाद झाला. याच कारणावरून आरोपींनी अभिनेत्रीच्या भावावर हल्ला केला. या हल्ल्यात हुमा कुरेशीचा भाऊ गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात घेऊन जात असतानाच त्याचा जीव गेला आणि पोलिसांनी त्याला मृत घोषित केले. हुमा कुरेशीच्या वहिणीने सांगितले की, पार्किंगवरून माझ्या पतीचे आणि शेजाऱ्यांचे भांडणे झाले होते. माझे पती हे ऑफिसवरून घरी आले होते तर आमच्या घरासमोर शेजाऱ्यांची गाडी लावण्यात आली होती. यावेळी त्यांनी शेजाऱ्यांना स्कूटी येथून काढून इतर ठिकाणी पार्क करण्यास सांगितली.
शेजाऱ्यांनी गाडी काढली नाही आणि माझ्या पतीला घाण घाण शिव्या देण्यास सुरूवात केली. त्यानंतर हा वाद इतका टोकाला पोहचला की, त्यांनी थेट हल्ला केला. या हल्ल्यात माझे पती गंभीर जखमी झाले. आम्ही त्यांना रूग्णालयात घेऊन गेलो पण त्यांचा जीव गेला. आता या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर या हत्या प्रकरणाबद्दल पोलिसांना माहिती मिळाली.पोलिसांनी लगेचच कारवाई करत संबंधित आरोपीला लगेचच अटक केलीये. या घटनेचा तपास हा पोलिसांकडून केला जात आहे. या शेजाऱ्यांमध्ये अजून काही वाद आहेत का? याचाही शोध घेतला जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा आसिफ कुरेशी हा चूलत भाऊ आहे. फक्त गाडी घरासमोरून काढण्यास सांगितल्याने इतका मोठा वाद झाल्याचे बघायला मिळतंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.