🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' शिक्षण संस्थाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू'

' शिक्षण संस्थाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू'
 

सांगली:  सांगलीचे लोकप्रिय आमदार श्री. सुधीर दादा गाडगीळ यांची शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी निवड केली आहे. या निवडीबद्दल सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या  वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
 
 
या प्रसंगी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव श्री. विनोद पाटोळे यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार दादांचा गौरव केला. यावेळी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष तथा भाजपा जैन प्रकोष्ट महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री. रावसाहेब पाटील, प्राचार्य एम. एस. राजपूत, श्री. भारत दुधाळ व श्री. प्रशांत अवधूत उपस्थित होते. सत्कार निमित्ताने झालेल्या चर्चेत शिक्षण संस्थांसमोरील विविध अडचणी पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीर दादांसमोर मांडल्या. यावर प्रतिसाद देताना मा. सुधीर दादांनी शासन दरबारी योग्य ते प्रयत्न करून त्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे आश्वासन  दिले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.