Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि सेवक हेच कर्मवीर पतसंस्थेचा आधारस्तंभ :-चेअरमन श्रीमती भारती चोपडे

सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि सेवक हेच कर्मवीर पतसंस्थेचा आधारस्तंभ :- चेअरमन श्रीमती भारती चोपडे
 

शाखा अंकली चे प्रशस्त आधुनिक वास्तुत रुपांतरण अंकली कर्मवीर पतसंस्थेचा नांवलौकीक महाराष्ट्रात आहे कारण या संस्थेच्या सभासदांनी दिलेला विश्वास, ठेवीदारांनी ठेवीच्या रुपाने व्यक्त केलेले प्रेम, कर्जदारांनी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करुन त्यांनी स्वतःची प्रगती साध्य करुन संस्थेचे कर्ज वेळेत परत फेड केली आणि संस्थेचा सेवक वर्ग प्रामाणिकपणे संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देत आहे या सर्वामध्ये योग्य समन्वय राखून संस्थेचे व्यवस्थापन योग्य दिशेने काम करीत असल्यामुळे कर्मवीर पतसंस्थेची प्रगती झाली आहे. म्हणुनच सभासद, ठेवीदार, कर्जदार सेवक हेच कर्मवीर पतसंस्थेचा खरा आधार आहेत असे मत संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी व्यक्त केले. संस्थेच्या अंकली शाखेच्या कार्यालयाचे प्रशस्त, अद्ययावत वास्तुमध्ये रुपांतर करण्यात आले त्यानिमित्त आयोजित विधिवत पुजा त्यांच्या हस्ते संपन्न झाली त्यावेळी सभासदांशी संपर्क साधताना त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. एस. पी. मगदूम यांनी केले. ही शाखा सन १९९८ मध्ये सुरु झाली आहे. या शाखेचा व्यवसाय ३५ कोटीहुन अधिक आहे. तर मार्च २०२५ चा नफा रु.६६ लाख आहे. सभासदांचा वाढता प्रतिसाद पाहून संस्थेने या शाखा कार्यालयाचे वाढीव प्रशस्त व आधुनिक कार्यालयात रुपांतर करण्यात आले आहे. संस्था ६४ शाखा मधुन कार्यरत आहे. संस्थेची सभासद संख्या ६८००० आहे. संस्था सभासदांच्या प्रगतीला हातभार लावत असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
यावेळी अंकली शाखेचे सल्लागार श्री विजयकुमार आकाराम पाटील यांनी शाखेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी शाखा सल्लागार श्री. अजितकुमार भिमगोंडा पाटील, श्री. राजगोंडा बापूसो पाटील, श्री. दादासो भिमराव शिंदे यांच्यासह अंकलीचे माजी सरपंच श्री. किर्तीकुमार अनिल सावळवाडे माजी सरपंच किरणकुमार धनपाल कुंभार. यांच्यासह दिगंबर जैन मंदिराचे सर्व ट्रस्टी व सभासद ठेवीदार उपस्थित होते. यावेळी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे शाखेच्यावतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. एस.बी. पाटील (मोटके) तज्ञ संचालक श्री. लालासो भाऊसो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे सभासद, सेवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.