किरकोळ वादातून मित्रानेच संपविले : हल्लेखोर पोलिसात हजर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. ही घटना कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये महावितरणच्या कार्यालयासमोर घडली. या प्रकरणातील संशयिताने स्वतःच कुपवाड पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. मयूर सचिन साठे (वय २४, रा. सोनी, ता.
मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर प्रताप राजेंद्र चव्हाण (२४,
रा. सोनी, आलेल्या संशयित हल्लेखोराचे नाव ता. मिरज) असे अटक करण्यात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर साठे आणि संशयित प्रताप चव्हाण हे दोघेही सोनी (ता. मिरज) येथील रहिवासी असून, ते मित्र होते. प्रताप चव्हाण हा कुपवाड परिसरातील संजय औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत रखवालदार म्हणून काम करत होता. बुधवारी सकाळपासून हे दोघे मित्र एका दुचाकीवरून एकत्र फिरत होते. रात्री त्यांनी भोसे (ता. मिरज) येथे महामार्गालगतच्या एका हॉटेलमध्ये पार्टी केली. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर ते दोघेही कुपवाड एमआयडीसीमध्ये आले.महावितरण कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यालगत गटारीजवळच्या झुडपात बसून ते रागाच्या भरात तिथेच पडलेला दगड गप्पा मारत होते. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर प्रतापने उचलून मयूरच्या डोक्यात आणि तोंडावर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन मयूरचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर प्रताप घटनास्थळावरून पळून गेला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात पाठवला. दरम्यान, गुरुवारी सकाळी प्रताप चव्हाण स्वतः कुपवाड पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास कुपवाड पोलिस करत आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.