Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लेकीच्या जन्मानंतर मिळतात ५०,००० रुपये; माझी कन्या भाग्यश्री योजना नक्की आहे तरी काय?

लेकीच्या जन्मानंतर मिळतात ५०,००० रुपये; माझी कन्या भाग्यश्री योजना नक्की आहे तरी काय?
 

महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजना राबवल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री. माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींना आर्थिक मदत मिळते. मुलींच्या जन्माचे दर वाढवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना आहे तरी काय? 

माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींना एकरकमी ५०,००० रुपये दिले जातात. मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत दरवर्षी पैसे दिले जातात. या योजनेत गरीब कुटुंबातील मुलींना योजनेचा लाभ घेता येणार आहे.१ एप्रिल २०१६ रोजी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

वीकीपीडियानुसार,ज्या कुटुंबाचे उत्पन्न ७.५ लाखांपर्यंत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याआधी फक्त उत्पन्न १ लाख रुपये असेल तरच लाभ मिळत होता. परंतु आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे.

या योजनेत मुलीच्या जन्मानंतर जर आईवडिलांनी परिवार नियोजन केले तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. मुलीच्या कुटुंबाच्या नावावर ५०,००० रुपये जमा केले जाणार आहेत.या योजनेत मुलींच्या नावावर १ लाखांचा अपघात विमा मिळणार आहे. या योजनेत एका कुटुंबातील फक्त २ मुलींनाच मदत मिळणार आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या योजनेत मुलीच्या जन्मानंतर दरवर्षी अजून काही लाभ दिले जातात. या योजनेत मुलीच्या उच्च शिक्षणासाठीही मदत केली जाते.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये दिले जातात. मुलगी पहिलीत गेल्यावर ६००० रुपये, सहावीत गेल्यावर ७००० रुपये आणि अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातात. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५००० रुपये दिले जातात.या योजनेत एकूण १ लाख १ हजार रुपये दिले जातात.

माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे?

माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींना पैसे मिळाला. मुलींचा जन्मदर वाढावा, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना कोणत्या सरकारने राबवली आहे?

माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. २०१६ मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी उत्पन्नाची पात्रता काय आहे?

माझी कन्या भाग्यश्री योजनेत त्याच मुलींना लाभ मिळणार आहे ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न ७.५ लाखांपेक्षा कमी असेल.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अट काय?

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मानंतर पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत किती पैसे मिळतात?

माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलीच्या जन्मानंतर ५०,००० रुपये मिळतात. याचसोबत इतर अनेक लाभ मिळतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.