अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक जुने विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, ज्यामुळे मोठी खळबळ व चर्चा रंगली आहे. 'द व्ह्यू' या लोकप्रिय टॉक शोमधील २००६ सालच्या एका व्हिडिओमध्ये ट्रम्प यांनी त्यांची मुलगी इवांका ट्रम्प हिच्याबद्दल एक धक्कादायक विधान केले होते. व्हिडिओमध्ये ट्रम्प आणि त्यांची मुलगी इवांका शोच्या होस्टसोबत बसलेले दिसत आहेत. त्यावेळी, शोच्या होस्टने विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले, "जर इवांका माझी मुलगी नसती तर मी कदाचित तिला डेट केले असते." हे ऐकून इवांका हसली, पण शोमधील इतर होस्टनी या विधानावर नाराजी व्यक्त करत याला "विचित्र" आणि "आजारी विचारसरणी" असे म्हटले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या
अतिरिक्त शुल्कामुळे सद्या भारत अमेरिका संबंध बिघण्याच्या स्थितीत आहेत.
अशातच, डोनाल्ड ट्रम्प यांचा जुना मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
झालाय. त्यावर आता नेटकरी प्रचंड टीका करू लागले आहेत.
यापूर्वीही व्हारयल झाला होता ट्रम्प यांचा व्हिडिओ
२०२४ च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि त्यांच्या टीमने ट्रम्प आणि त्यांचे सहकारी उमेदवार जेडी व्हान्स यांच्यावर हल्ला करण्यासाठी या क्लिपचा वापर केला होता. यानंतर, ट्रम्प यांच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिले की हे विधान फक्त एक विनोद होता आणि ट्रम्प यांनी स्वतःला विनोदी पद्धतीने सादर केले होते, कारण ते तरुण महिलांना डेट करण्यासाठी ओळखले जातात.
प्लेबॉय मासिकाबद्दलही केले होते भाष्य!
याच शोमध्ये पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इवांका आणि प्लेबॉय मासिकाबद्दलही काही वादग्रस्त विधाने केली होती. जेव्हा एका होस्टने त्यांना विचारले की, "जर प्लेबॉय मासिकाने इवांकाला मुखपृष्ठावर छापले तर तुम्ही काय कराल?", तेव्हा ट्रम्प यांनी उत्तर दिले की, "ते निराशाजनक असेल... नाही, खरे सांगायचे तर, ते मासिकाच्या आत काय आहे यावर अवलंबून असेल." जेव्हा होस्टने विचारले की, नग्न फोटो नसल्यास तुम्हाला काही हरकत नाही का, तेव्हा ट्रम्प म्हणाले, "मला वाटत नाही की इवांका असे करेल, जरी तिचे व्यक्तिमत्व उत्तम आहे... आणि मी तर आधीच म्हटले आहे की जर ती माझी मुलगी नसती तर मी कदाचित तिला डेट केले असते."
इवांका ट्रम्प कोण आहे?
जन्म : इवांका ट्रम्प ही डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी, चेक मॉडेल इवाना ट्रम्प यांची मुलगी आहे. तिचा जन्म १९८१ मध्ये न्यू यॉर्क शहरात झाला.शिक्षण : तिने जॉर्जटाउन विद्यापीठात दोन वर्षे शिक्षण घेतले आणि नंतर २००४ मध्ये बॅचलर पदवी पूर्ण केली.करिअर: इवांकाने १९९७ मध्ये मॉडेलिंगची सुरुवात केली होती आणि ती 'सेव्हेंटीन' मासिकाच्या मुखपृष्ठावरही दिसली होती.राजकीय सहभाग: २०१९ च्या निवडणुकीनंतर इवांका तिच्या वडिलांसोबत राजकारणात सक्रिय झाली. पहिल्या कार्यकाळात तिने आणि तिचा पती जेरेड कुशनर यांनी ट्रम्प यांच्या प्रशासकीय टीममध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.कौटुंबिक जीवन: २००९ मध्ये तिने जेरेड कुशनरशी लग्न केल्यानंतर यहुदी धर्म स्वीकारला. तिला तीन मुले आहेत
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.