मनोज जरांगेंसह मराठा आरक्षणाचं भगवं वादळ मुंबईत दाखल; आझाद मैदान हाउसफुल्ल!
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आज (शुक्रवार) मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोल न करण्यात येणार आहे . दरम्यान थोड्याच वेळात मनोज जरांगे देखील या आंदोलन स्थळी पोहचणार आहे . अशातच या आंदोलना पूर्वी च राज्यभरातून आलेल्या हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांनी मैदान हाउस फुल्ल झालं आहे . आझाद मैदानावर आंदोल नासाठी केवळ 5 हजार लोकांची परवानगी देण्यात आली होती . मात्र हि मर्यादा केव्हाच ओलांडल्याचे बोललं जात आहे . त्यामुळे आजच्या या आंदोलना ची पुढची दिशा काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे थोड्याच वेळात आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. सध्या ते वाशीतून मुंबईकडे रवाना झालेत. यावेळी वाशी टोलनाक्यावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत धडकतायेत. तिकडे चेंबूरमध्येही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलिसांची तुकडी आणि दंगल नियंत्रण पथक चेंबूर येथे दाखल झालंय. तिकडे आझाद मैदानावरही शेकडो मराठा आंदोलक जमले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा आता मराठ्यांनी घेतल्याचं दिसत आहे. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिलीये. त्यामुळे संध्याकाळी सहानंतर मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक काय भूमिका घेणार हे पहाणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा... 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.