Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रोज रात्री छोटीशी लवंग खाणं खूप फायद्याचं, डॉक्टरांनी सांगितले एकापेक्षा एक जबरदस्त फायदे...

रोज रात्री छोटीशी लवंग खाणं खूप फायद्याचं, डॉक्टरांनी सांगितले एकापेक्षा एक जबरदस्त फायदे...
 

लवंग एक असा मसाला आहे, ज्याचा वापर किचनमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. ज्यामुळे पदार्थांची टेस्ट वाढते. सोबतच लवंग शरीरालाही अनेक फायदे देते. खासकरून रात्री लवंग खाण्याचे अनेक फायदे मिळतात. अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर एरिक बर्ग यांनी रात्री लवंग खाण्याच्या फायद्यांबाबत माहिती दिली आहे. चला पाहुयात काय आहेत हे फायदे...  डॉक्टरांनी यूट्यूब चॅनलवर याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ते सांगतात की, छोटीशी लवंग आरोग्यासाठी रामबाण उपायासारखी काम करते. खासकरून रात्री लवंग खाणं किंवा तिचं पाणी पिणं शरीराला अनेक फायदे देतं.


पचन सुधारतं
डॉक्टर सांगतात की, झोपण्याआधी लवंगाचं पाणी प्यायल्यानं गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
चांगली झोप

लवंगात असे नॅचरल गुण असतात, जे मानसिक तणाव कमी करून मेंदू शांत ठेवतात. ज्यामुळे आपल्याला चांगली झोप लागते. झोप चांगली झाली तर अनेक समस्या दूर होतात.

लिव्हर डिटॉक्स
शरीरातून विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी लवंग मदत करते. खासकरून रात्री एक किंवा दोन लवंग चावून खाल्ल्यास किंवा याचं पाणी प्यायल्यास लिव्हरची सुद्धा आतून सफाई होते.
सर्दी-खोकला होतो दूर

डॉक्टर बर्ग सांगतात की, लवंग गरम असते आणि यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. जे घशातील खवखव, खोकला आणि कफ दूर करण्यास मदत करतात.

दात आणि हिरड्या होतात मजबूत
रात्री लवंग चावून खाल्ल्यास श्वासाची दुर्गंधी दूर होते. सोबतच तोंडाचं आरोग्य चांगलं राहतं. तसेच दातांमध्ये होणारी वेदनाही दूर होत.

इम्यूनिटी वाढते

वरील सगळ्या फायद्यांसोबतच डॉक्टर सांगतात की, रात्री लवंग खाल्ल्यानं किंवा याचं पाणी प्यायल्यानं यातील अ‍ॅंटी-मायक्रोबिअल गुण शरीराची इम्यूनिटी वाढवतात. ज्यामुळे अनेक रोगांचा धोका कमी होतो.

कसं बनवाल लवंगचं पाणी?
4 ते 5 लवंग एक कप पाण्यात टाकून उकडा. 5 मिनिटांनंतर गॅस बंद करा. हे पाणी थंड झाल्यावर एक तासानं प्या. झोपण्याच्या 30 मिनिटांआधी हे पाणी प्यावं. याचा प्रभाव लवकरच शरीरात दिसू लागेल. तसेच लवंग रोज थेट चावूनही खाऊ शकता. लवंगाचे अनेक फायदे असले तरी जास्त प्रमाणात खाणं नुकसानकारक ठरू शकतं. कारण लवंग गरम असते. जर कुणाला अॅलर्जी असेल किंवा लवंगाचं पाणी पिऊन अस्वस्थ वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.