अलिकडे कमी वयाचे भरपूर लोक हार्ट अॅटॅकने आपला जीव गमावतात. खासकरून तरूणांमध्ये हार्ट अॅटॅकचं प्रमाण अधिक वाढलेलं बघायला मिळत आहे. आधी केवळ वृद्धांनाच हार्ट अॅटॅक अधिक येत होते. पण आता स्थिती बदलली आहे. याची कारणंही वेगवेगळी आहेत. आपण पाहिलं असेल की, जिममध्ये वर्कआउट करताना अनेकांना हार्ट अॅटॅक आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियातील अनेक व्हिडिओंमध्ये बघायला मिळतं की, जिममध्ये ट्रेडमीलचा वापर करताना किंवा इंटेंस एक्सरसाईज करताना तरूण अचानक बेशुद्ध पडतात, त्यांना नंतर हार्ट अॅटॅक आल्याचं कळतं. अशात हे जाणून घेणं खूप महत्वाचं ठरतं की, वर्कआउट दरम्यान तरूणांना हार्ट अॅटॅक का येतो?
काय असतं कारण?
कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. आलोक चोप्रा यांनी ४० पेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये हृदयासंबंधी आजारांचा धोका वाढण्याचं एक कारण सांगितलं आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. डॉक्टरांनुसार अनेकांना वाटतं की, वर्कआउट करताना हार्ट अॅटॅक येण्याला ट्रेडमिल जबाबदार असेल, पण असं नाहीये. डॉक्टर म्हणाले की, ४० पेक्षा कमी वयाच्या लोकांना हृदयासंबंधी समस्या ट्रेडमिलमुळे नाही तर मेटाबॉलिक डिसफंक्शनमुळे होते.
काय आहे मेटाबॉलिक डिसफंक्शन?
मेटाबोलिक डिसफंक्शन तेव्हा होतं जेव्हा शरीर अन्नाची प्रक्रिया त्या पद्धतीनं करत नाही, ज्यासाठी ते बनलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीराचं मेटाबॉलिज्म म्हणजेच अन्नाला एनर्जीमध्ये बदलणं आणि सेल्सचं प्रॉडक्शन व रिपेअरिंगची प्रोसेस योग्यपणे काम करत नाही. यामुळे हृदयासंबंधी समस्या कमी वयाच्या लोकांमध्ये वाढत आहेत. याकडे दुर्लक्ष केलं जातं. जर शरीरच आधीच आतून कमजोर झालं असेल तर ट्रेडमिल त्याला फक्त धोक्यापर्यंत पोहोचवतं.
हार्ट अॅटॅकची इतरही कारणं
क्रॉनिक इंफ्लेमेशनतणावकमी झोपपोषक तत्वांची कमतरताहृदय निरोगी कसं ठेवाल?पौष्टिक आहारफिजिकल अॅक्टिविटीवजन नियंत्रित ठेवास्मोकिंग, अल्कोहोल सोडाकोलेस्टेरॉल, ब्लड शुगर कमी ठेवाब्लड प्रेशर कंट्रोल ठेवापुरेशी झोप घ्या
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.