Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'1900 कोटी दिलेत अजून किती...?' प्रियाच्या वकिलाने विचारताच करिश्मा म्हणाली...; संजय कपूरच्या 30000 कोटींच्या संपत्तीसाठी महाभारत

'1900 कोटी दिलेत अजून किती...?' प्रियाच्या वकिलाने विचारताच करिश्मा म्हणाली...; संजय कपूरच्या 30000 कोटींच्या संपत्तीसाठी महाभारत
 

संजय कपूर यांच्या अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यानंतर वाद सुरु झाला त्यांच्या 30000 कोटींच्या संपत्तीचा...हा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. संजय कपूरने करिश्मा कपूरला घटस्फोट दिल्यानंतर त्यांची दोन्ही मुलं आईसोबत राहत आहेत. संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेवबद्दल अनेक धक्कादायक आरोप समोर येत आहे. संजय कपूरच्या निधनानंतर त्यांची आई यांनी प्रियाविरोधात मालमत्तेसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. आता त्यात करिश्मा कपूने मुलं समायरा आणि कियानच्या वतीने मालमत्तेवर हक्क मिळावा म्हणून न्यायालयात कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टात सुनावणीदरम्यान प्रियाने करिश्मा कपूरला विचारलेल्या प्रश्नानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात करिश्मा कपूरच्या मुलांकडून वरिष्ठ वकील महेश जेठमलानी हे खटले सादर केला. तर राजीव नायर आणि श्रेयाल तेथरने प्रियाची बाजू मांडली. या सुनावणीत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप केलेत. न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या खटल्याची सुनावणी सुरु असताना प्रियाच्या वकिलाने करिश्माला धक्कादायक प्रश्न विचारला.

या सुनावणीदरम्यान प्रियाने तिच्या कायदेशीर टीममार्फत दावा केला की, समायरा आणि कियान यांना खटला दाखल करण्यापूर्वीच ट्रस्टकडून 1900 कोटी रुपयांची मालमत्ता दिली होती. कपूर कुटुंबाचा ट्रस्ट असलेल्या राणी कपूर ट्रस्टकडून प्रियाचा दावा पुढे नेताना तिच्या वकिलाने सांगितलं की मला माहित नाही की त्यांच्यासाठी किती पैसे अजून पुरेसे असणार आहेत. यासोबतच प्रियाने दावा केला की, खटला दाखल करण्यापूर्वी फक्त पाच दिवस आधी सांगण्यात आला होता. त्यानंतर सूर त्यांचा बदलेला दिसला. तुम्ही म्हणता की तुम्हाला मालमत्तेतून काहीही मिळाले नाही, असंही ती म्हणाली. यासोबतच, प्रियाने कायदेशीर टीममार्फत मृताच्या आत्म्याला सहानुभूती दाखवण्याची विनंतीही न्यायालयात केली आहे. 
 
संजय कपूरने करिश्मा कपूरला घटस्फोट दिल्यानंतर त्यांची दोन्ही मुलं आईसोबत राहत आहेत. संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेवबद्दल अनेक धक्कादायक आरोप समोर येत आहे. संजय कपूरच्या निधनानंतर त्यांची आई यांनी प्रियाविरोधात मालमत्तेसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. आता त्यात करिश्मा कपूने मुलं समायरा आणि कियानच्या वतीने मालमत्तेवर हक्क मिळावा म्हणून न्यायालयात कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टात सुनावणीदरम्यान प्रियाने करिश्मा कपूरला विचारलेल्या प्रश्नानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. 

बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात करिश्मा कपूरच्या मुलांकडून वरिष्ठ वकील महेश जेठमलानी हे खटले सादर केला. तर राजीव नायर आणि श्रेयाल तेथरने प्रियाची बाजू मांडली. या सुनावणीत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप केलेत. न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या खटल्याची सुनावणी सुरु असताना प्रियाच्या वकिलाने करिश्माला धक्कादायक प्रश्न विचारला.



संजय कपूरच्या बहिणीने काय आरोप केला?

संजय कपूरची बहीण मंधीरा कपूर माध्यमाशी बोलताना धक्कादायक विधान केलं आहे. ती म्हणाली की, त्या दिवशी मी तिथेच होते आणि जोरात दार वाजवत होते. मी पाहिले की दार आतून बंद होते. नंतर माझ्या आईने मला सांगितले की, बंददाराआड तिला काहीतरी सही करण्यास भाग पाडलं गेलं. आई खूप दुःखी होती. मग आम्ही या लोकांनी आईला कशावर सही करायला लावली याचा शोध घेतला. पण आम्हाला कोणताही कागद सापडला नाही. यानंतर, मंधीरानेही आरोप केला की, तिथून सर्व काही चोरीला गेले. तिच्या आईकडून सर्व काही कसे हिसकावून घेतले गेले हे खूप वैयक्तिक आणि खूप वेदनादायक आहे. इतकंच नाही तर संजय कपूरच्या बहिणीने हा मालमत्तेचा वाद नाही तर वारसा, सत्य आणि प्रामाणिकपणाचा लढा असल्याच म्हटलं आहे.

फॅक्ट

1. संजय कपूर यांच्या मृत्यूचे कारण काय होते?
संजय कपूर, सोना कॉमस्टारचे माजी अध्यक्ष, यांचे 12 जून 2025 रोजी लंडनमधील पोलो सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी मधमाशी गिळल्याने ऍनाफिलॅक्टिक शॉक आल्याने हृदयविकाराचा झटका आला, असे अहवाल सांगतात.
2. संजय कपूर यांच्या संपत्तीचा वाद काय आहे?
संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या 30,000 कोटी रुपयांच्या संपत्तीवरून वाद सुरू झाला आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नी करिश्मा कपूर यांच्या मुलांनी (समायरा आणि कियान) आणि तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेव यांच्यात मालमत्तेच्या वाटणीसाठी कायदेशीर लढाई सुरू आहे. याशिवाय, संजय यांची आई राणी कपूर यांनीही मालमत्तेवर हक्क सांगितला आहे.
3. संजय कपूर यांच्या मुलांनी कोणत्या आरोपाखाली कोर्टात याचिका दाखल केली आहे?
करिश्मा कपूर यांची मुले, समायरा (वय 20) आणि कियान (वय 15), यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सावत्र आई प्रिया सचदेव यांनी संजय कपूर यांची वसीयत बनावट केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला की प्रिया यांनी वसीयत सात आठवडे लपवली आणि 30 जुलै 2025 रोजी कौटुंबिक बैठकीत ती सादर केली. त्यांनी वसीयत अवैध आणि बनावट असल्याचे सांगितले आणि प्रत्येकी एक-पंचमांश हिस्सा मागितला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.