Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रात्री 2 वाजता मोबाईलवर आलेला मेसेज पाहून महिला अधिकाऱ्याच्या पायखालची जमीन सरकली; नांदेडमधील धक्कादायक प्रकार

रात्री 2 वाजता मोबाईलवर आलेला मेसेज पाहून महिला अधिकाऱ्याच्या पायखालची जमीन सरकली; नांदेडमधील धक्कादायक प्रकार
 

नांदेडमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्री 2 वाजता महिला मुख्याधिकाऱ्यांना व्हाट्सअप वर एक मसेज आला. हा मेसेज वाचून महिला अधिकाऱ्याच्या पायाखलाची जमीन सरकली. जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने हा मेसेज पाठवला होता. मेसेज पाठवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

बदली केल्याच्या रागातून जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने रात्री 2 वाजता महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या मोबाईलवर आणि विभाग प्रमुखांच्या व्हाट्सअप ग्रुपवर अश्लील आणि धमकी देणारा मेसेज पाठवला. रात्री 2 वाजता हा प्रताप करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे. आनंद सावंत असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. आनंद सावंत हा नांदेड जिल्हा परिषदेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याची बदली दुसऱ्या विभागात करण्यात आली. दुसऱ्या विभागात बदली केल्याच्या रागातून रात्री 2 वाजता सावंत याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप मेसेज पाठवला. 
 
राजकीय भाष्य करून असभ्य आणि अश्लील भाषेत धमकीचा मेसेज केला. विभाग प्रमुखांच्या ग्रुपवरही सावंत याने मेसेज केला. याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आनंद सावंत याचे निलंबन केले. एका अधिकाऱ्याने चक्क रात्री 2 वाजता महिला मुख्याधिकाऱ्यांना अश्लील भाषेत धमकीचा मेसेज पाठवल्याने नांदेडमध्ये खळबळ उडालीये



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.