मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दागिने चोरणाऱ्या इंदापुरातील
एकाला अटक कारसह 5.0 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : मिरज तालुक्यातील एरंडोली येथील दाम्पत्याला मूल होण्याचे औषध देतो असे सांगून त्यांच्याकडील दागिने लंपास करणाऱ्या इंदापूर येथील एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून कारसह दागिने असा 5.0 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
नागेश राजू निकम (वय ३६, रा. निमनिरगाव, ता. इंदापुर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 31 ऑगस्ट रोजी संशयित एरंडोली येथे दाम्पत्याच्या घरी गेला होता. तुम्हाला मूल होण्यासाठी औषध देतो असे सांगून महिलेला देव्हाऱ्यात बसण्यास सांगितले तसेच अंगावरील सर्व दागिने काढून कापडावर ठेवण्यासाठी सांगून ते दागिने एका हंड्यात ठेवले. वीस मिनिट कोणाशी काही नाही बोलता तेथेच बसण्यास सांगितले. काही वेळाने दाम्पत्य बाहेर आल्यावर ती व्यक्ती दागिने घेऊन पळून गेल्याचे लक्षात आले. नंतर त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यातील चोरट्याला पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते.
पथकातील सागर लवटे यांना ही चोरी नागेश निकम याने केली असून तो कारमधून (एम एच १२ पी एच ८७९५) माधवनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करून कारसह दागिने जप्त करण्यात आले. त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सागर लवटे, नागेश खरात, सागर टिंगरे, संदीप नलावडे, अमिरशा फकीर, सतिश माने, संदीप गुरव, मच्छिद्र बर्डे, उदयसिंह माळी, अमर नरळे, इम्रान मुल्ला, केरूबा चव्हाण, विक्रम खोत, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील शशीकांत जाधव, विकास भोसले, सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजीत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.