Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाण्याच्या बाटलीच्या झाकणाच्या रंगात दडलंय मोठं रहस्य, 99 टक्के लोकांना माहीत नाही यामागचं कारण

पाण्याच्या बाटलीच्या झाकणाच्या रंगात दडलंय मोठं रहस्य, 99 टक्के लोकांना माहीत नाही यामागचं कारण
 

आपण बाहेर असताना तहान लागल्यावर लगेच पाण्याची बाटली विकत घेतो. पण बाटलीच्या झाकणाचा रंग कधी तुमच्या लक्षात आला आहे का? निळा, पांढरा, हिरवा, पिवळा किंवा काळा, प्रत्येक रंगाचा एक खास अर्थ असतो. हा रंग बाटलीत कोणत्या प्रकारचं पाणी आहे, हे सांगतो. चला, बाटलीच्या झाकणाच्या रंगांमागचं रहस्य जाणून घेऊया.

झाकणाच्या प्रत्येक रंगाचा असतो खास अर्थ

पाण्याच्या बाटलीच्या झाकणाचे रंग हे फक्त डिझाइनचा भाग नाहीत, तर ते त्यातील पाण्याची गुणवत्ता आणि स्त्रोत सांगतात.

1. निळे झाकण:
बाजारात तुम्हाला बहुतेक बाटल्या निळ्या झाकणाच्या दिसतील. निळ्या झाकणाचा अर्थ असा होतो की, हे पाणी थेट झऱ्यातून घेतलेले आहे, म्हणजेच हे मिनरल वॉटर आहे. हे पाणी आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं.
2. पांढरे झाकण:

निळ्या रंगाच्या झाकणानंतर सर्वात जास्त पांढऱ्या रंगाच्या झाकणांच्या बाटल्या दिसतात. पांढऱ्या झाकणाचा अर्थ असा आहे की, हे पाणी मशीनने शुद्ध केले आहे. म्हणजेच, हे पाणी आरओ प्लांट किंवा अशाच एखाद्या फिल्टर मशीनमधून शुद्ध करून भरले आहे. हे पाणीही पिण्यासाठी सुरक्षित आणि चांगलं असतं.

3. काळे झाकण:
काळ्या झाकणाच्या बाटल्या बाजारात कमी दिसतात, कारण हे पाणी खूप महाग असतं. या पाण्याला अल्कलाइन वॉटर म्हणतात. ते खास पद्धतीने शुद्ध केलं जातं आणि त्यात अनेक मिनरल्स असतात. हे पाणी जास्त करून सेलिब्रिटी आणि खेळाडू वापरतात.
4. पिवळे झाकण:

काही पाण्याच्या बाटल्यांना पिवळ्या रंगाचे झाकण असते. पिवळ्या झाकणाचा अर्थ असा आहे की, या पाण्यात व्हिटॅमिन आणि इलेक्ट्रोलाइट्स मिसळलेले आहेत. हे पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं, कारण ते शरीराला ऊर्जा देतं.

5. हिरवे झाकण:
हिरव्या झाकणाच्या बाटल्यांमध्ये नैसर्गिकरित्या शुद्ध केलेले पाणी असते. हे पाणी नैसर्गिक स्त्रोतांपासून येते, जे थेट शुद्ध करून भरले जाते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पाण्याची बाटली खरेदी कराल, तेव्हा झाकणाच्या रंगावर नक्की लक्ष द्या. यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्यानुसार आणि आवडीनुसार योग्य पाणी निवडता येईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.