Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :- रेड लाईट एरियात गेला आणि फोन पे चा पासवर्ड विसरला ; चिडलेल्या महिलांनी भर रस्त्यात चोपला

पुणे :- रेड लाईट एरियात गेला आणि फोन पे चा पासवर्ड विसरला ; चिडलेल्या महिलांनी भर रस्त्यात चोपला
 

पुणे :- पैसा नही तो इधर काय को आने का ?, असे म्हणत बुधवार पेठेत वेश्‍यागमनासाठी आलेल्या एका व्यक्तीला तीन महिलांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सिंहगड रोडवरील रहिवासी आणि मूळ जालना जिल्ह्यातील ३९ वर्षीय व्यक्ती शुक्रवारी रात्री बुधवार पेठेतील नवी बिल्डिंग इमारतीत गेला होता.

त्याने ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी फोन पे ॲप उघडले. ऐनवेळी त्याचा पासवर्ड विसरल्याने व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. बराच वेळ झाला तरी पैसे मिळाले नाहीत. यामुळे चिडलेल्या महिलांनी त्याला शिवीगाळ केली. एवढ्यावर हा प्रकार थांबला नाही. अन्य महिलांना बोलावून त्याच्यावर हल्ला चढवला. तिघींनी मिळून त्याला जबर मारहाण केली. या घटनेनंतर पीडिताने फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून दोन ३२ वर्षीय व एक ३४ वर्षीय महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.