Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनाने आमदार जयंत पाटील आमदार विश्वजीत कदम खासदार विशाल दादा पाटील यांनी एकत्रित आल्यास महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे:, सुभाष खोत.

मनाने आमदार जयंत पाटील आमदार विश्वजीत कदम खासदार विशाल दादा पाटील यांनी एकत्रित आल्यास महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे.. सुभाष खोत.
 

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका या सर्व निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत त्यामुळे हे तिन्ही नेते मनाने एकत्रित आल्यास या कार्यकर्त्यांच्या निवडणुका कार्यकर्ते निश्चितपणे या सगळ्या संस्थावर महाविकास आघाडीचा झेंडा फडणल्याशिवाय राहणार नाहीत असा आत्मविश्वास सुभाष खोत कोषाध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी व्यक्त केला आहे.

फक्त जयंत पाटील साहेब आणि विश्वजीत साहेब एकत्र येऊन निवडणूक लढवून चालणार नाही तर यांच्या जोडीला विशाल दादा पाटील हे हवेच त्याचप्रमाणे विश्वजीत कदम साहेब आणि विशाल दादा पाटील हे एकत्र येऊन निवडणूक जिंकू शकणार नाहीत तर यांच्या जोडीला माननीय जयंत पाटील साहेब हे पाहिजेत. हे आता सांगली जिल्ह्याचे समीकरण झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये वरील सगळ्या नेत्यांनी आतून एक आणि बाहेरून एक असे करून चालणार नाही नेत्यांच्याकडून थोडीशी जरी चूक झाली तर याचा फायदा भाजप निश्चितपणे उठवू शकते. 
 
आतून एक बाहेरून एक आता बस झालं या जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भरपूर सोसले आहे परत आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये नेत्यांनी एकत्रितपणे राहून कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल. आपल्या लोकसभेच्या निवडणुकीत व विधानसभेच्या निवडणुकीत अन्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन तुम्हाला विजय मिळवून दिलेला आहे आत्ता नेत्यांवर तुमची परीक्षा आहे. तुम्ही एकत्रित राहिलात आणि कार्यकर्त्यांना न्याय दिलात तर मात्र इथून पुढे सांगली जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टी हद्दपार होईल. अन्यथा परत भारतीय जनता पार्टीला नेत्यांनी सत्तेवर बसवलं अशी समजूत कार्यकर्त्यांची होईल आणि येणाऱ्या तुमच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना कंदील लावून शोधावे लागेल असा इशारा सुभाष खोत यांनी आपल्या नेत्यांना दिला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.