महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जेपी नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाच्या कार्यकाळ काही दिवसांत पूर्ण होणार आहे. भाजपकडून नव्या अध्यक्षपदाची चाचपणी करण्यात येत आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. पुढील काही दिवसांत भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहे. त्याआधीच पाच नावे चर्चेत आहेत. देवेंद्र फडणवीस, मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर यांची नावे आघाडीवर आहेत.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी सध्या भाजपकडून सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त राज्यातील प्रदेक्षाध्यक्षांची निवड झाल्यानंतर भाजपकडून केंद्रीय अध्यक्षांची निवडणूक घेतली जाईल. लवकरच भाजप अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या विश्वासाला पात्र असणारा नेताच भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो. शिवाय संघाकडूनही त्या नावावर शिक्कामोर्तब होणं महत्त्वाचं आहे.न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मोदी सरकारमधील दोन मोठ्या नावांचा गंभीरपणे विचार सुरू आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्या नावाचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "संदेश देण्यात आला आहे, मात्र फडणवीस यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत अजून चर्चा सुरू आहे. त्यांच्या नावाचा भाजप अध्यक्षपदासाठी गांभीर्याने विचार होऊ शकतो. ते तरुण नेते असून, त्यांना संघाचा पाठिंबा आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास आहे." या सर्व घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
निवडणुका कधी होणार?
भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजप यावर निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय भाजपने संभाव्य उमेदवारांची यादी देखील तयार केल्याचे वृत्त आहे. ज्याचा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर विचार केला जाईल. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.