Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'बँक ऑफ महाराष्ट्र'त नोकरी हवीय? सुरू झालीय मोठी भरती; जाणून घ्या सगळी माहिती

'बँक ऑफ महाराष्ट्र'त नोकरी हवीय? सुरू झालीय मोठी भरती; जाणून घ्या सगळी माहिती
 

बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या कामकाजाचा विस्तार आणि प्रशासकीय व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी 'रिक्रूटमेंट प्रोजेक्ट 2025-26 - फेज II' अंतर्गत विशेष अधिकारी  पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती Scale II, III, IV, V आणि VI या स्तरांवरील विविध पदांसाठी असून, पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

कोणत्या पदांसाठी सुरू झालीय भरती

भरतीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रमुख पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
क्रेडिट: उप महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक.
वित्तीय व्यवस्थापन: मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक.
एकात्मिक जोखीम व्यवस्थापन: वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक.
आयटी, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, स्ट्रॅटेजिक डेटा मॅनेजमेंट, आयएस ऑडिट, सीआयएसओ सेल: उप महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक.
ट्रेजरी आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग: उप महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक.
विधी: वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक.
चार्टर्ड अकाउंटंट: वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक.
माहिती व जनसंपर्क: सहायक महाव्यवस्थापक.

कुठे आणि कसा कराल अर्ज?
वरील पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यापदांसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अन्य गरजा काय आहेत याबद्दलचा तपशीलही प्रसिद्ध करण्यात आला आहे.(Bank Of Maharashtra Job Recruitment 2025) ही सगळी माहिती बँक ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ही माहिती 'या लिंकवर क्लिक केल्यास' उपलब्ध आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर असून अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील असे सांगण्यात आले आहे. भरती प्रक्रियेतील कोणत्याही शंकेचे निरसन करण्यासाठी 020-25614561 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल असे बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.