आजकाल काही तरी नवीनच ऐकायला मिळते. म्हणजेच कधी कोणता ट्रेंड व्हायरल होईल ते सांगता येत नाही. काही ट्रेंड हे ऐकून तर आपल्याला आश्चर्य वाटते. असाच एक अजब प्रकार जगातील सुंदर देश म्हंटल्या जाणाऱ्या थायलंडमध्ये घडतो. थायलंड हे खरे तर जगातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे पण तुम्हाला थायलंडबद्दल आणखी एक गोष्ट माहित आहे का? ती म्हणजे थायलंडच्या काही भागात भाड्याने बायको मिळते. आणि इतकेच नव्हे तर त्याचा रेटही ठरवला जातो.
थायलंडमधला भन्नाट ट्रेंड
थायलंडच्या पट्टाया शहरात हा ट्रेंड बऱ्याच काळापासून सुरू आहे. याला 'Wife on Hire' किंवा 'Black Pearl' असेही म्हणतात. खरे तर, यामध्ये एकप्रकारे तात्पुरते लग्नाचे सुख उपभोगता येते. म्हणजेच महिलेला पैसे देऊन काही काळासाठी तिला बायको म्हणून सोबत ठेवता येते. यानंतर ती महिला बायकोप्रमाणे सर्व कामही करते. जसे की, स्वयम्पाक करणे, बाहेर फिरायला येणे, एकत्र एका खोलीत राहणे. मात्र हा संपूर्ण काळ एक प्रकारचा करार असतो आणि याला कायदेशीर विवाह म्हणून मान्यता नसते. हळूहळू हा ट्रेंड इथे आता व्यवसाय बनला आहे. यामध्ये सर्वात रंजक बाब म्हणजे या काळात तुम्हाला ती महिला आवडली तर तुम्ही तिच्याशी कायदेशीर लग्न देखील करू शकता. मात्र यासाठी तिची संमती असणे गरजेचे आहे.
असा ठरतो रेट
भाड्याने बायको होणाऱ्या महिलांचा रेट हा विविध गोष्टींवर अवलंबून असतो. म्हणजेच त्यांचे वय, शिक्षण आणि तुम्हाला किती वेळ ती महिला बायको म्हणून भाड्याने हवी आहे. अहवालांनुसार सुमारे १.३ लाख रुपयांपासून ते ९६ लाख रुपये पर्यंत हे दर असू शकतात. हा खासगी करार असतो.
का वाढतोय ट्रेंड?
थायलंडमधील शहरीकरण आणि वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे लोक एकाकी पडले आहेत. अशा परिस्थितीत, बरेच जण कायमस्वरूपी नातं जोडण्याऐवजी तात्पुरत्या नात्यांना महत्त्व देऊ लागले आहेत. यामुळेच थायलंडमध्ये आता भाड्याने बायको घेण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे.
जपान आणि कोरियाची संकल्पना
भाड्याने बायको घेण्याचा हा ट्रेंड जपान आणि कोरियासारख्या देशांमध्ये पूर्वीपासून सुरू आहे. 'गर्लफ्रेंड फॉर हायर' सारख्या सेवा तेथे आधीच सुरू आहेत. थायलंडनेही हे मॉडेल स्वीकारले आणि आता ते पर्यटन उद्योगाचा एक भाग महत्त्वपूर्ण भाग बनले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.