Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माझी मैत्री बघितली, आता दुश्मनी बघशील..पाकिस्तानी गँगस्टरने लॉरेन्स बिश्नोईला दिली धमकी

माझी मैत्री बघितली, आता दुश्मनी बघशील..पाकिस्तानी गँगस्टरने लॉरेन्स बिश्नोईला दिली धमकी
 

भारतीय गँगस्टर्समध्ये पहिल्यांदा पोर्तुगालमध्ये गँगवॉर दिसून आलं. लॉरेन्स गँगशी संबंधित रणदीप मालिक याने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून फायरिंगची जबाबदारी घेतली. आम्ही रोमी आणि प्रिन्सच्या ठिकाणावर गोळीबार केला असं पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं. या सगळ्या प्रकरणात एक व्हिडिओ सुद्धा रिलीज करण्यात आला आहे. तेच आता एक गँगवार समोर आलय. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीने दावा केलाय की, लॉरेन्स बिश्नोईने त्याचे गुंड पाठवून त्याच्या ठिकाणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शहजाद भट्टीने फेसबुक पोस्टवर दावा केला की, त्याच्या घराबाहेर त्याच्या हत्येसाठी गुंड पाठवण्यात आले होते. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीने दावा केला की, लॉरेन्स बिश्नोईने आपले गुंड पाठवून त्याच्या ठिकाणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शहजाद भट्टीने फेसबुक पोस्टमध्ये दावा केला की, त्याच्या घराबाहेर त्याच्या हत्येसाठी गुंड पाठवण्यात आले.

लॉरेंन्ससोबत एका व्हिडिओ कॉलमध्ये दिसलेल्या पाकिस्तानी गँगस्टरने दावा केला की, लॉरेन्सला त्याची हत्या करायची होती. शहजादने सोशल मीडियावर एक वीडियो पोस्ट केला. त्यात एक व्यक्ती बोलताना दिसतोय की, तुझ्या फ्लॅटवर आहे. त्यानंतर शहजाद त्याला चॅलेंज करुन त्याच्या लोकेशनवर पोहोचला. तिथे पोहोचून व्हिडिओ बनवला. या दरम्यान लॉरेंन्सला धमकी दिली. स्वत:ला डॉन समजतोस तर तुझे गुंड परत पाठवं. तू बाकी लोकांसाठी गँगस्टर असशील, माझ्यासमोर काही नाही. गँगस्टर बनून लोकांना मारण्याची हौस असेल, तर ये. अन्यथा ज्या दिवशी जेलमधून बाहेर येशील, त्यावेळी तुला समजेल कोण किती मोठा गुंड आहे.

भारतात पुन्हा गँगवार सुरु झालय

शहजाद भट्टी बोलला की, माझं नाव शहजाद भट्टी आहे. माझी मैत्री तू पाहिली आहेस, आता दुश्मनी पण बघ. मी काही सिद्धू मुसेवाला नाही. त्याचे वडील म्हातारे आहेत. काही करु शकले नाहीत. पण मला हात लावशील, तर तुझे तुकडे-तुकडे होतील. तू एजन्सीचा मदारी आहेस. इतकच नाही, शहजादने एका व्हिडिओच्या माध्यमातून 5 कोटी रुपयांची मागणी केली. पोर्तुगालच्या केसची सुद्धा आठवण करुन दिली. यातून एक गोष्ट स्पष्ट आहे, भारतात पुन्हा गँगवार सुरु झालय.

म्हणूनच पाकिस्तानात त्याच्यावर बंदी
शहजाद भट्टी पाकिस्तानी गँगस्टर आहे. त्याने काही दिवसांपूर्वी गँगस्टर लॉरेंस बिश्नोईला व्हिडिओ कॉल केलेला. त्याशिवाय तो सतत त्याच्या इन्स्टाग्रामवर चिथावणीखोर व्हिडिओ टाकत असतो. सोबत शस्त्रांचे सुद्धा व्हिडिओ पोस्ट करतो. शहजाद भट्टीचा पाकिस्तानी माफीया आणि अंडरवर्ल्डच्या मोठ-मोठ्या गुंडांशी संबंध आहे. म्हणूनच पाकिस्तानात त्याच्यावर बंदी आहे. टीव्ही 9 ने त्याला प्रश्न विचारल, त्यावेळी तो बोलला की, माझ्यावर बंदी नाहीय. मी स्वत:साठी आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी दुसऱ्या देशात आसरा घेतला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.