देशभरात निवडणूक आयोगावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच आयोगाने ईव्हीएम मशीनबाबत मोठा बदल जाहीर केला आहे. यामुळे मतदान प्रक्रिया आणखी स्पष्ट आणि पारदर्शक होणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत प्रथमच ईव्हीएमवर उमेदवारांचे रंगीत फोटो दिसणार आहेत. यामुळे मतदारांना उमेदवार ओळखणे अधिक सोपे होईल. तसेच, ईव्हीएमवरील अनुक्रमांक आता मोठ्या आणि ठळक अंकात दिसतील, जेणेकरून कुठलाही संभ्रम राहणार नाही.
निवडणूक नियमावली 1961 च्या नियम 49 ब मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार:
- ईव्हीएमवर उमेदवारांचे रंगीत फोटो छापले जातील.- फोटोच्या ३/४ भागात उमेदवाराचा चेहरा असेल.- अनुक्रमांक आंतरराष्ट्रीय भारतीय अंकांत दर्शवला जाईल.- या अंकांचा फॉन्ट साइज 30 आणि बोल्ड असेल.- यामुळे मतदानावेळी मतदारांना योग्य उमेदवार ओळखणे अधिक सोपे जाईल.आयोगाने हा निर्णय पारदर्शकता आणि स्पष्टता वाढवण्यासाठी घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, विरोधक वारंवार ईव्हीएमवर शंका उपस्थित करत असल्याने आता ते या नव्या निर्णयावर कोणती भूमिका घेणार? हा मोठा प्रश्न आहे. विशेषतः बिहार निवडणुकीत या नियमांची अंमलबजावणी होणार असल्याने राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.