Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्ज घेतलेल्यांना मोठा धक्का! हप्ता भरला नाही तर आता तुमचा फोन होणार लॉक

कर्ज घेतलेल्यांना मोठा धक्का! हप्ता भरला नाही तर आता तुमचा फोन होणार लॉक
 

मोबाईल हप्त्यांवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही धक्कादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आता असा नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे, ज्यानुसार जर तुम्ही मोबाईल फोनचा EMI भरला नाही तर तुमचा फोन थेट रिमोटने लॉक केला जाऊ शकतो. बँकांचे बुडीत कर्ज (NPA) कमी करण्यासाठी हा निर्णय विचाराधीन आहे.


भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू हप्त्यांवर खरेदी करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. होम क्रेडिट फायनान्सच्या 2024 च्या स्टडीनुसार, एक तृतीयांश ग्राहक मोबाईल EMI वर खरेदी करतात. अशा परिस्थितीत, EMI थकल्यास बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्या मोबाईलला लॉक करू शकतील, असा नियम लवकरच लागू होऊ शकतो. TRAI च्या आकडेवारीनुसार, भारतात 1.16 अब्जाहून अधिक मोबाईल कनेक्शन आहेत. त्यामुळे हा नियम लागू झाल्यास कोट्यवधी ग्राहकांवर त्याचा परिणाम होईल.


मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआय फेअर प्रॅक्टिसेस कोड अपडेट करण्याच्या तयारीत आहे. या कोडमध्ये फोन-लॉकिंगशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश असेल.
- कोणताही फोन लॉक करण्यापूर्वी ग्राहकाची पूर्वसंमती घेणे अनिवार्य असेल.

- बँका किंवा कर्ज देणाऱ्यांना लॉक केलेल्या फोनमधून वैयक्तिक डेटा अॅक्सेस करण्यास सक्त मनाई असेल.

- हा नियम केवळ EMI वसुलीसाठी वापरला जाईल, ग्राहकांच्या सुरक्षेवर कुठलाही परिणाम होणार नाही.

गेल्या वर्षी काही बँका EMI थकित ग्राहकांचे फोन लॉक करण्यासाठी विशेष अॅप इन्स्टॉल करीत होत्या. मात्र त्यावेळी आरबीआयने ही पद्धत थांबवण्याचे आदेश दिले होते. आता ग्राहक आणि बँकांशी चर्चा करून, अधिक सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने हा नियम पुन्हा लागू करण्याची तयारी सुरू आहे.

या नियमानंतर EMI न भरल्यास ग्राहकांवर अधिक दबाव येईल. कर्ज फेडण्यास विलंब झाला तरी फोन वापरणं अशक्य होईल. त्यामुळे मोबाईल EMI वर खरेदी करणाऱ्यांनी वेळेवर हप्ते भरणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.