Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?
 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे भारतातील दोन मोठे सेलिब्रेटी आहेत... विराट हा जगातील क्रिकेटचा नायक, तर अनुष्का बॉलिवूड अभिनेत्री... त्यामुळे जगभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या विराट-अनुष्का आपल्या दोन मुलांसोबत लंडनमध्ये आहेत आणि क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. मुलांचा सांभाळ करण्यासाठी अनुष्काने अभिनयातून थोडा ब्रेक घेतला आहे, तर विराटने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० व कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. आता विराट पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वन डे मालिकेत खेळताना दिसणार आहे.

पण, विराट-अनुष्का या सेलिब्रेटींना न्यूझीलंडच्या कॅफेतून बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याच्या किस्सा समोर आला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील मधल्या फळीतील फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने  हा किस्सा सांगितला आहे. न्यूझीलंडच्या कॅफेमध्ये ती आणि स्मृती मानधना यांनी विराट व अनुष्का यांच्यासोबत जवळपास चार तास गप्पा मारल्या होत्या.

जेमिमाने Mashable India ला दिलेल्या मुलाखतीत ही स्टोरी सांगितली. तिच्या सांगण्यानुसार न्यूझीलंडच्या हॉटेल कॅफेमध्ये भारताचे पुरुष व महिला संघाचे खेळाडू राहायला होते. तेव्हा विराट व अनुष्कासोबत गप्पा सुरू झाल्या... या गप्पा एवढ्या रंगल्या की चार तास कधी निघून गेले, तेच कळले नाही. 'विराट आम्हाला म्हणाला की, तू आणि स्मृती यांच्यात महिला क्रिकेट बदण्याची धमक आहे आणि तो बदल होताना मी पाहतोय,' असे जेमिमा म्हणाली.
 
क्रिकेटच्या पलिकडे गप्पा रंगल्या आणि त्यामुळे बराच वेळ गेला.'असं वाटत होतं की बऱ्याच वर्षांनी दोन मित्र भेटले आहेत आणि गप्पा मारत आहेत,' असे जेमिमा म्हणाली. एवढ्या वेळ गप्पा रंगलेल्या पाहून कॅफेचा कर्मचारी आला आणि आम्हाला त्याने बाहेर जाण्याची विनंती केली. कर्मचाऱ्याने आम्हाला बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा कुठे त्या गप्पा थांबल्या, असेही ती पुढे म्हणाली.

भारत-ऑस्ट्रेलिया मालिका केव्हा?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वन डे व पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पहिली वन डे १९ ऑक्टोबरला पर्थ येथे होईल, त्यानंतर एडिलेड व सिडनी येथे अनुक्रमे २३ व २५ ऑक्टोबरला लढती होतील. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या पुनरागमाची सर्वांना उत्सुकता आहे. विराटला २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे आणि त्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ही मालिका महत्त्वाची आहे. विराटने ऑस्ट्रेलियात २९ सामन्यांत ५१.०४ च्या सरासरीने १३२७ धावा केल्या आहेत. त्यात पाच शतकांचा समावेश आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.