Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोणत्या वयात मुलांची उंची नेमकी किती वाढते? डॉक्टर सांगतात, मुलं ठेंगणी राहू नयेत म्हणून 'एवढं' करा...

कोणत्या वयात मुलांची उंची नेमकी किती वाढते? डॉक्टर सांगतात, मुलं ठेंगणी राहू नयेत म्हणून 'एवढं' करा...
 

प्रत्येक पालकांना वाटते की, त्यांच्या मुलांची उंची चांगली वाढावी. एवढंच नाही तर त्या - त्या वयात योग्य प्रमाणात उंची वाढावी अशी इच्छा असते. मुलांची उंची ही त्यांच्या  एकूण वाढीचा आणि आरोग्याचा महत्त्वाचा भाग असते. पालकांमध्ये नेहमीच ही उत्सुकता असते की त्यांच्या मुलांची उंची योग्य प्रमाणात वाढते आहे का... अशा परिस्थितीत, अनेकदा कित्येक  पालकांच्या मनात प्रश्न येतो की, मुलांची उंची त्यांच्या वयानुसार योग्य आहे की नाही? प्रत्येक वयात मुलांची उंची किती असावी याबद्दल डॉक्टरांनी  ठरवलेले काही मापदंड आहेत. या मापांवरून मुलांची उंची योग्य आहे का, हे समजून घेता येते. त्यामुळे पालकांनी मुलांची उंची वेळोवेळी तपासणे आणि वयानुसार ती योग्य आहे का हे पाहणे खूप गरजेचे असते.

प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ संदीप गुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी मुलांची वाढ कशी होते आणि कोणत्या वयात त्यांची उंची किती वाढते, याबद्दल माहिती दिली आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्समुळे तुमच्या मुलाची उंची योग्य त्या वयात, व्यवस्थित वाढत आहे की नाही हे तपासता येईल.

डॉक्टर सांगतात, वयानुसार मुलांची उंची नेमकी किती असावी ?
१. पहिल्या वर्षातील मुलांची उंची :- डॉ. गुप्ता यांच्या मते, जन्मानंतरचे पहिले वर्ष मुलांच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचे असते. या काळात मुलांचे वजन आणि उंची दोन्ही वेगाने वाढतात. पहिल्या वर्षात मुलांची उंची साधारणपणे २५ सेंटीमीटरपर्यंत वाढते.

२. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात :- डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या वर्षी मुलांची उंची सुमारे १२.५ सेंटीमीटर वाढते. तिसऱ्या वर्षी ही वाढ थोडी कमी होऊन ७.५ ते १० सेंटीमीटरपर्यंत राहते. 
 
3. तीन ते सहा वर्षापर्यंत :- जेव्हा मूल ३ ते ४ वर्षांचे होते, तेव्हा त्याची उंची वर्षाला सुमारे ७ सेंटीमीटर इतकी वाढते. त्यानंतर, ५ ते ६ वर्षांच्या दरम्यान ही वाढ आणखी थोडी कमी होऊन दर वर्षी सुमारे ६ सेंटीमीटरपर्यंत वाढते.

४. पौगंडावस्थेपर्यंतची वाढ :- व्हिडिओमध्ये डॉक्टर पुढे सांगतात की, सहा वर्षांच्या वयापासून पौगंडावस्था सुरू होईपर्यंत, मुलांची उंची दरवर्षी सरासरी ५ सेंटीमीटर वाढते. पौगंडावस्थेच्या काळात पुन्हा वाढीचा वेग वाढतो, ज्यामध्ये मुलांची उंची वेगाने वाढू शकते.
 



मुलांची उंची योग्य पद्धतीने वाढते की नाही, हे पहाणे का आहे आवश्यक ?

डॉ. गुप्ता यांच्या मते, मुलांची उंची त्यांच्या पोषणाची स्थिती आणि एकूणच त्यांच्या आरोग्याचे संकेत देते. जर एखाद्या विशिष्ट वयात मुलाची उंची ठरलेल्या मानकांनुसार वाढत नसेल, तर ते पोषणाची कमतरता, हार्मोनल समस्या किंवा इतर कोणत्याही वैद्यकीय स्थितीचे लक्षण असू शकते. त्यामुळे मुलांच्या उंचीकडे पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे असते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.