सांगली : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महानगरपलिकेचे प्रभारी मुख्य उद्यान अधीक्षक डॉ. रवींद्र ताटे यांना तीन महिने निलंबित, तर नगर रचना विभागातील पंकजा कोरे, अण्णासाहेब मगदूम, यासिनगली : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महानगरपलिकेचे प्रभारी मुख्य उद्यान अधीक्षक डॉ. रवींद्र ताटे यांना तीन महिने निलंबित, तर नगर रचना विभागातील पंकजा कोरे, अण्णासाहेब मगदूम, यासिन मंगळवारे, रवींद्र भिंगारदिवे, अभिजित मोरे व शाबाज शेख या कनिष्ठ अभियंत्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. मंगळवारे, रवींद्र भिंगारदिवे, अभिजित मोरे व शाबाज शेख या कनिष्ठ अभियंत्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. आयुक्त सत्यम गांधी यांनी ही कारवाई केली.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कर्तव्यात कसूर केल्याबद्दल मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांची काही दिवसापूर्वी प्रभारी मुख्य उद्यान अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. दैनंदिन फिरती करून उद्यान देखभाल दुरुस्ती व दैनंदिन कामकाजाबाबतचे फोटो ग्रुपवर शेअर करणे व धोकादायक बनलेली झाडे तोडणे, झाडांच्या धोकादायक फांद्या तोडणे यासंदर्भात सूचना दिलेल्या होत्या. मात्र अपेक्षित कार्यवाही झाली नाही. कामकाज असमाधानकारक झाले. त्यांच्यावर सोपविलेल्या पदाची जबाबदारी, कार्यकर्तव्य ते सक्षमपणे पार पाडीत नसून कर्तव्यात कसूर करीत असल्याचा ठपका ठेवत त्यांना तीन महिने निलंबित करण्यात आले. आयुक्त सत्यम गांधी यांनी ही कारवाई केली. यात कनिष्ठ अभियंता पंकजा कोरे, अण्णासाहेब मगदूम, यासिन मंगळवारे, रवींद्र भिंगारदिवे, अभिजित मोरे व शाबाज शेख या अधिकार्यांचा समावेश आहे. यातील कोरे वगळता अन्य अभियंता मानधन तत्त्वावर महापालिका सेवेत आहेत. महापालिकेचे प्रभारी मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाईची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.