Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोपटानं केली मालकाची पोलखोल! बायकोनं नवऱ्याला कामवालीसोबत रंगेहात पकडलं, नेमकं काय घडलं...

पोपटानं केली मालकाची पोलखोल! बायकोनं नवऱ्याला कामवालीसोबत रंगेहात पकडलं, नेमकं काय घडलं...
 

सोशल मीडियावर एका धक्कादायक तितकीच विचित्र घटनेचे जोरदार चर्चा सुरू आहे. ही कुवेतमध्ये घडली आहे, पण इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरली आहे. बायकोनं पाळीव पोपटाच्या मदतीन नवऱ्याला कामवालीसोबत रंगेहात पकडलं. पोपटानं या प्रकरणात पीडित महिलेची कशी मदत केली, ते तर फासच इंटरेस्टिंग आहे. कुवेतमधील या दाम्पत्यानं घरात एक पोपट पाळला होता. नवरा आणि कामवालीचं गुपचूप गुटूर गू सुरू होतं. बायकोला या प्रकरणाची भनक नसली तर पोपट या सगळ्या प्रकरणाचा साक्षीदार होता.

आपला मालक त्याच्या पत्नीसोबत फ्लर्ट करत असल्याचं पाहून पोपटाला दुःख झालं. त्यानं तिला मदत करण्याचं ठरवलं. महिला घरी आल्यानंतर पोपटानं वेगळ्या पद्धतीनं कामवालीचं नाव वारंवार घेतलं, ज्यामुळे महिलेच्या मनात तिच्याविषयी संशय आला. मात्र, तिला ठोस पुरावा मिळू शकला नाही. तिला नवरा आणि कामवालीला रंगेहात पकडायचं होतं. तिनं यासाठी एक योजना आखली. महिलेनं पोपटाला नवऱ्याच्या पाळतावर सोडलं. एक दिवस ती ऑफिसमधून लवकर घरी आली. नवरा आणि कामवालीला तिनं नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं. या घटनेमुळे पत्नीचा संशय पूर्णपणे सिद्ध झाला. दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. महिलेनं कामवालीला कामवरून काढून टाकलं.

न्यायालयात पोपटाची साक्ष

शेवटी हे प्रकरण कोर्टात गेलं. तिथे पोपटाच्या साक्षीचाही विचार करण्यात आला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजू लक्षात घेऊन कामवालीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या नवऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

ही घटना आपल्याला शिकवते?
घरातील कोणतेही रहस्य लपवणं शक्य नाही. अगदी पोपटसारखे निरीक्षकही आपल्या घरातील सत्य उघड करू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने आपले वर्तन आणि निष्ठा याकडे लक्ष द्यायला हवे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.