Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली: डेंग्यूमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू; डासांचा उच्छाद

सांगली: डेंग्यूमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू; डासांचा उच्छाद
 

विटा : येथील शाळकरी मुलीचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. अपूर्वा विनायक भंडारे (वय 16) असे मृत मुलीचे नाव आहे. अपूर्वा येथील तासगाव रस्त्यालगतच्या कुटुंबासह राहत होती. तिच्या आजीचा पाच दिवसापूर्वी मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या दिवस कार्यात आई-वडील व्यस्त होते. गेल्या दोन दिवसांपासून अपूर्वाला थंडी आणि ताप होता. पेशी कमी झाल्याने तिला सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिला डेंग्यूची लागण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पावसाळी वातावरणामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. संसर्गजन्य आजारांनी लोक त्रस्त आहेत. डेंग्यूसारख्या आजारांनीही अनेकजण रुग्णालयात दाखल आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.