Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"तुम पे अॅक्शन लूंगा, इतनी डेरिंग है तुम्हारी.; पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांनी अजित पवारांना ओळखलं नाही; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर.

"तुम पे अॅक्शन लूंगा, इतनी डेरिंग है तुम्हारी.; पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांनी अजित पवारांना ओळखलं नाही; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर.
 

सोलापूर: माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या करमाळा विभागाच्या पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन संभाषण व व्हिडीओ कॉल प्रकरण सध्या चर्चेत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गावात रस्त्यासाठी सुरू असलेल्या मुरूम उत्खननाच्या तक्रारीनंतर अंजली कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी स्थानिक ग्रामस्थांसोबत त्यांची शाब्दिक चकमक झाली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून कृष्णा यांच्या हातात दिला.

फोनवरून पवारांनी स्वतःची ओळख करून देत कारवाई थांबवण्याचे आदेश दिले, मात्र अंजली कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही. त्यावर पवारांनी नाराजी व्यक्त करत "डीसीएम अजित पवार बोल रहा हूं… कारवाई बंद करो… मेरा आदेश है…" असे सांगितले. कृष्णा यांनी "मेरे फोन पर कॉल करें" असे उत्तर दिल्यावर पवार अधिकच संतापले. "तुम पे अॅक्शन लूंगा… इतनी डेरिंग है तुम्हारी… मेरा चेहरा तो पहचानोगी ना…" असे म्हणत त्यांनी तत्काळ व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉल आल्यानंतर अंजली कृष्णा थेट बांधावर बसून पवारांशी संवाद साधताना दिसतात. या संभाषणात पवारांनी कारवाई थांबवण्याचे निर्देश दिल्याचे स्पष्ट ऐकू येते. "माझा फोन आलाय, तहसीलदारांना सांगा," असेही ते म्हणताना दिसतात.  हा प्रकार तब्बल तीन तास सुरू होता. दरम्यान, ग्रामस्थांनी उत्खनन ग्रामपंचायतीच्या परवानगीने सुरू असल्याचा दावा केला, मात्र कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे महिला आयपीएस अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू ठेवली होती. या संभाषणाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.