भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य वक्तव्य केलं होतं. यावरून राज्यभर पडसाद पडत आहेत. गोपीचंद पडळकर यांनी राजाराम बापू यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी माफी मागण्यास देखील नकार दिला. पडळकरांच्या या वक्तव्याचा वाळवा तालुक्यात जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना सज्जड दम भरला.
अशोक वाटेगावकर म्हणाले, ' पडळकर काहीतरी वायचळ बोलतो. जयंत पाटालांविरूद्ध काहीतरी बोलतो. तो माणूस तुला काही आलतू फालतू वाटला का, तू कदाचित या वाळवा तालुक्यात यायचा विचार कर तुझे कपडे काढूनच पाठवतो. तू जत तालुक्यातून निवडून येऊन दाखवच. तुला समाजात काही काडीचीही किंमत नाहीत.'
वाटेगावकर पुढे म्हणाले, तालुक्यातीलच नाही तर राज्यातील धनगर समाजाला त्यानं मान खाली घालायला लावली. बापूंसारख्यांवर तो बोलतो एवढा मोठा झाला का तू...' अशोक वाटेगावकर यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले, त्यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय खळबळ उडाली आहे. पडळकर यांनी पाटलांचा एकेरी उल्लेख करत, त्यांच्या वडिलांचेही अपमानकारक शब्दांत उल्लेख केले आणि पाटील यांना 'बिनडोक' व 'भिकारी अवलाद' असे म्हणत राजकारणातील पातळी सोडली.त्यांनी जत तालुक्यातील निवडणुकीचे खुले आव्हान दिले आणि पाटील यांना खड्ड्यात घालण्याची भाषा केली. या वक्तव्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. सांगली जिल्ह्यात पडळकर यांच्या विरोधात आंदोलने झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना फोन करून समज दिली. जयंत पाटील यांनी या टीकेबद्दल प्रतिक्रिया देण्याचे टाळले. या वादातून महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या असभ्य भाषेविरोधात जनतेत संताप व्यक्त होताना दिसतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.