बॉलिवूडमध्ये निर्माते आणि कलाकारांचे अनेक मुद्द्यावर मतभेद असतात. मागील काही काळापासून निर्माते कलाकारांसोबत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चावर आक्षेप घेताना दिसत आहेत.अलिकडेच सायरस ब्रोचाच्या पॉडकास्टवर दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी याचसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. काही कलाकार सेटवर त्यांना सहा व्हॅनिटी व्हॅन हव्या असल्याची मागणी करतात, परंतु अमिताभ बच्चन सारखा सुपरस्टार कधीही निर्माताला त्यांच्या कर्मचाऱ्यांचा खर्च करण्यास सांगत नाही, असं संजय गुप्ता यांनी म्हटलं आहे.
एका व्हॅनमध्ये त्यांना नग्न बसायचं असतं
संजय यांनी स्पष्ट केले की हृतिक रोशन आणि अमिताभ बच्चन सारख्या स्टार्सकडे फक्त एक मेकअप पर्सन आणि एक स्पॉट बॉय असतो. मात्र आपण अशा कलाकारांना ओळखतो जे सहा 'अनिवार्य' व्हॅनिटी व्हॅन घेऊन येतात, असंही संजय यांनी स्पष्ट केलंय. "हे खरे आहे; मी खूप गंभीर आहे. पहिली व्हॅन ही त्याची वैयक्तिक जागा आहे. वहान साब नंगा बैठते हैं (नग्नावस्थेत कलाकारांना व्हॅनिटीमध्ये बसायचं असतं). त्याच्या पुढे सरांची दुसरी व्हॅन असते जिथे ते त्यांचे मेकअप आणि केसांचा सेटअप करतात. त्यानंतर, ती व्हॅन असते जिथे सर त्यांच्या बैठका घेतात. चौथी व्हॅन त्यांची जिम असते जिथे सर व्यायाम करतात," असं संजय यांनी सहा व्हॅनिटी घेऊन फिरणाऱ्यांवर निशाणा साधताना म्हटलंय.
जीम व्हॅनसोबत...
संजय गुप्ता यांनी स्पष्ट केले की जेव्हा वर्कआउट व्हॅन आणली जाते तेव्हा त्याचा अर्थ फक्त व्हॅन नसतो. त्यामध्ये एक ट्रेनर, एक असिस्टंट, ड्रायव्हर आणि एक मेंटेनन्स मॅन देखील असतो. म्हणजे फक्त एका व्हॅनमध्ये सहा लोक जोडलेले असतात. त्याशिवाय, मेकअप आणि हेअर टीम, स्टायलिस्टसह, सर्वजण त्यांचे स्वतःचे असिस्टंट आणतात. त्यांनी पुढे सांगितले की अन्न ही आणखी एक गरज आहे. एका अभिनेत्याला उपाशी ठेवता येत नाही, म्हणून दिवसभर सेटवर एक शेफ तैनात असतो, अन्नाचे वजन ग्रॅमने करतो. त्यासाठी दुसरी व्हॅन आवश्यक असते. गुप्ता यांनी अधोरेखित केले की मागील पाच व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी सहावी व्हॅन आवश्यक आहे.
अमिताभ बच्चन यांचे कौतुक
अमिताभ बच्चन यांचे कौतुक करण्यापूर्वी दिग्दर्शकाने असेही म्हटले की स्टार जोडपी 'आणखी वाईट' आहेत. "सेटवर 11 व्हॅन येतात. ते घरी एकत्र जेवतात ना? ते पती-पत्नी आहेत, आणि तरीही त्यांच्याकडे स्वयंपाकघरातील व्हॅन वेगळ्या आहेत! मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही. हे खरं आहे," असं संजय म्हणाले. "मिस्टर बच्चन कधीही त्यांच्या कर्मचाऱ्यांना पैसे देऊ देत नाहीत. काहीही द्यायचं नाही. रोज नाही, वाहन नाही, काही काहीच नाही. हा माझा कर्मचारी आहे. तो निर्मात्याचा चौकीदार नाही, अशी अमिताभ यांची भूमिका असते,' असं गुप्ता म्हणाले. "त्यांचा मेकअप मॅन, त्यांचा हेअरस्टायलिस्ट, त्यांचा ड्रायव्हर, त्यांचा मुलगा... ते तुमच्यासाठी मिस्टर बच्चन आहे. पण आता, दोन किंवा तीन जणांची सहाय्यकांची टीम 30 जणांची टीम झाली आहे," असं गुप्ता म्हणाले.
संजय गुप्ताच्या टिप्पण्यांपूर्वीच, राकेश रोशन आणि फराह खान दोघांनीही फराहच्या कुकिंग व्हीलॉग दरम्यान हीच समस्या सांगितली होती. सेटवर सहा व्हॅनिटी व्हॅनची मागणी करणाऱ्या कलाकारांवर त्यांनी टीका केली होती. काही कलाकार फक्त त्यांच्यासाठी निरोगी अन्न शिजवण्याच्या हेतूने वैयक्तिक शेफ ठेवतात, असं फराहने नमूद केलेलं.
संजय गुप्तांची दमदार कारकिर्द
संजय गुप्ता यांनी 1994 मध्ये 'आतिश: फील द फायर' या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यानंतर त्यांना 'काँटे' (2002), 'मुसाफिर' (2004), 'शूटआउट अॅट लोखंडवाला' (2007), 'शूटआउट अॅट वडाळा' (2013), 'जज्बा' (2015) आणि 'काबिल' (2017) या चित्रपटांमधून आपल्यातील संवेदनशील दिग्दर्शकाची झलक दाखवून दिली. 2024 मध्ये 'द मिरांडा ब्रदर्स' हा त्यांच्या 'व्हाइट फेदर फिल्म्स' या बॅनरखाली निर्मितीअसलेला स्पोर्ट्स ड्रामा होता.दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी कोणता खुलासा केला आहे?
संजय गुप्ता यांनी सायरस ब्रोचाच्या पॉडकास्टवर सांगितले की, काही कलाकार सेटवर सहा व्हॅनिटी व्हॅनची मागणी करतात, तर अमिताभ बच्चन यांसारखे सुपरस्टार निर्मात्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचा खर्च उचलण्यास सांगत नाहीत.सहा व्हॅनिटी व्हॅनचा वापर कशासाठी केला जातो?
संजय गुप्ता यांनी सांगितले की: पहिली व्हॅन: कलाकाराची वैयक्तिक जागा (काहीवेळा नग्न बसण्यासाठी).दुसरी व्हॅन: मेकअप आणि केसांचा सेटअप.तिसरी व्हॅन: बैठका घेण्यासाठी.चौथी व्हॅन: जिमसाठी (व्यायाम).पाचवी व्हॅन: अन्न तयार करण्यासाठी (शेफसह).सहावी व्हॅन: इतर कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी.व्हॅनिटी व्हॅनसोबत आणखी कोणते खर्च येतात?
एका व्हॅनसोबत ट्रेनर, असिस्टंट, ड्रायव्हर, मेंटेनन्स मॅन असे कर्मचारी येतात. याशिवाय मेकअप, हेअर टीम, स्टायलिस्ट आणि त्यांचे असिस्टंट यांचाही खर्च असतो. अन्नासाठी शेफ आणि स्वयंपाकासाठी स्वतंत्र व्हॅन लागते.अमिताभ बच्चन यांच्याबाबत संजय गुप्ता यांनी काय सांगितले?
अमिताभ बच्चन कधीही निर्मात्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचा खर्च उचलण्यास सांगत नाहीत. त्यांच्याकडे फक्त मेकअप मॅन, हेअरस्टायलिस्ट, ड्रायव्हर आणि एक मुलगा असतो. ते स्वतःच्या कर्मचाऱ्यांचा खर्च स्वतः करतात.स्टार जोडप्यांबाबत संजय गुप्ता यांचे काय म्हणणे आहे?
संजय गुप्ता यांनी सांगितले की, स्टार जोडपी सेटवर 11 व्हॅनिटी व्हॅन आणतात. पती-पत्नी असूनही त्यांचे स्वयंपाकघर वेगळे असते, ज्यामुळे खर्च आणखी वाढतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.