Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जॅक निसटल्याने चारचाकी छातीवर आदळून तरुणाचा मृत्यू

जॅक निसटल्याने चारचाकी छातीवर आदळून तरुणाचा मृत्यू
 

बामणोली : चारचाकी वाहनाचे पंक्चर झालेले चाक बदलत असताना गाडीला लावलेला जॅक अचानक निसटला. त्यामुळे गाडी छातीवर आदळून वाहन मालक युवकाचा जागीच मृत्यू झाला. प्रणय शंकर भोसले (वय 25, रा.तेटली, ता. जावली) असे मृत युवकाचे नाव आहे. ही दुर्घटना तेटली (ता. जावली) गावात घडली.

प्रणय याचा हॉटेल व्यवसाय आहे. गुरुवारी सकाळी जॅक लावून चारचाकीचे पंक्चर झालेले चाक तो बदलत होता. यावेळी गाडी आणखी उचलणे गरजेचे वाटल्याने तो गाडीच्या खाली शिरला व जॅक परत वर चढवू लागला. मात्र, याचवेळी जॅक अचानक सटकून बाजूला पडला व गाडी त्याच्या छातीवर पडली. त्याच्या किंकाळ्यांनी लगतच हॉटेलमध्ये असलेल्या त्याच्या पत्नीने धाव घेतली. प्रणयचे वडीलही लगोलग धावले; मात्र त्यांना गाडी उचलली जात नव्हती. त्यानंतर त्यांनी गावात फोन करून लोकांना बोलावून त्याला बाहेर काढले. उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. दरम्यान, प्रणयचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.