आपल्या हातातील रेषांमध्येच नशीब दडलेलं असतं, आणि त्या रेषाच आपलं आयुष्य ठरवतात. हस्तरेखाशास्त्रानुसार, हाताच्या तळव्यावरील रेषा पाहून व्यक्तीच्या भवितव्याचा अंदाज घेता येतो. हातावर असलेल्या तीन प्रमुख रेषांपैकी जीवनरेषा सर्वात महत्त्वाची मानली जाते. या रेषेतून व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांची माहिती मिळू शकते. इतकंच नाही तर या रेषेच्या आधारे व्यक्ती किती काळ जगेन याचंही भाकीत केलं जाऊ शकतं.
जीवनरेषा कुठे असते?
हाताच्या तळव्यावर अंगठा आणि तर्जनी यांच्या मधल्या भागातून तीन रेषा सुरू होतात -
हृदयरेषा
मस्तिष्करेषा
जीवनरेषा
यापैकी जीवनरेषा तळव्याच्या मध्यातून सुरू होऊन मनगटाजवळील मणिबंधापर्यंत जाते. काहींच्या हातात ही रेषा खूपच स्पष्ट दिसते, तर काहींच्या हातात ती कापलेली, द्वीप किंवा त्रिकोणांनी भरलेली असते. कुठे ती दोन भागांत विभागलेलीही दिसते.
आयुष्य मोजण्याची पद्धत
हस्तरेखाशास्त्रानुसार, जीवनरेषेच्या सुरुवातीपासून मणिबंधापर्यंतचे अंतर साधारणतः ८० वर्षे मानलं जातं.
जर जीवनरेषा मणिबंधाच्या पलीकडे जाऊन अंगठ्याच्या मुळापर्यंत (शुक्र पर्वत) पोहोचली असेल, तर ती व्यक्ती १०० वर्षांपर्यंत जगू शकते, असा संकेत असतो.
आयुष्य मोजण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. अंगठ्याच्या मुळापासून (शुक्र पर्वतावरून) छोटी बोट जिथे आहे त्या दिशेने एक काल्पनिक रेषा काढा. ही रेषा जीवनरेषेला ज्या ठिकाणी छेदते, तो बिंदू ४० वर्षांचा टप्पा दर्शवतो.
या बिंदूपासून जीवनरेषेच्या वरच्या भागाचे दोन समान भाग केल्यास मधला टप्पा २० वर्षे दर्शवेल.
४० वर्षांच्या बिंदूपासून मणिबंधापर्यंतच्या मध्यावर एक बिंदू ठेवल्यास तो ६० वर्षे दर्शवतो. शेवटी मणिबंधाजवळील टप्पा ८० वर्षांचे चिन्ह मानले जाते.
जीवनरेषेवरून काय कळते?
जर रेषा सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्पष्ट आणि सरळ असेल, तर व्यक्ती ८० वर्षे किंवा त्यापेक्षाही जास्त जगू शकते.
जर रेषा कुठे कापलेली असेल किंवा त्यावर क्रॉस, द्वीप, त्रिकोण यासारखी चिन्हे असतील, तर त्या वयात आयुष्यात अडचणी किंवा आरोग्याशी संबंधित अडथळे येऊ शकतात.
जीवनरेषा जिथे संपते, तिथेच व्यक्तीच्या आयुष्याचा शेवट मानला जातो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.