कोल्हापूर : पोलिस आणि तृतीयपंथीय यांच्यात रविवारी दुपारी येथील मध्यवर्ती दाभोळकर कॉर्नर परिसरातील एका हॉटेलसमोर तुंबळ मारामारी झाली. पोलिसांच्या अंगावर हात उगारणार्या तृतीयपंथीयाला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिस दप्तरी या घटनेची नोंद झाली नव्हती.
दाभोळकर कॉर्नर परिसरातील एका हॉटेलमधील महिला कर्मचारी आणि तृतीयपंथीय याच्यात जोरात वादावादी झाली. प्रकरण हातघाईवर आल्यानंतर चौकात बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या पोलिसाला महिला कर्मचार्याने मदतीला बोलावले. पोलिसानी महिलेसह तृतीयपंथीयाला समज देवून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी शाब्दीक वादावादी व शिवीगाळीचा प्रकार घडला. त्यामुळे वादाला वेगळे वळण लागले.यावेळी झालेल्या झटापटीमुळे वाद वाढत गेला. पोलिसाच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकार घडल्याने त्यांच्यात भरचौकात हाणामारी झाली. नागरिकांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला. शाहूपुरी पोलिसांनी तृतीयपंथीयाला ताब्यात घेतले. मात्र समज देऊन त्याची सुटका करण्यात आली. पोलिस निरीक्षक संतोष डोके यानी या घटनेला दुजोरा दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.