डॉक्टरच्या बायकोला जाळ्यात अडकवलं; प्रायव्हेट व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, लाखो पैसे लुबाडले, अखेर..
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ३४ वर्षीय विवाहित महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका अज्ञात तरूणानं महिलेची ३.७३ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. एवढंच नाही तर, महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत होता. शेवटी महिलेनं पोलिसांकडे धाव घेतली.
नेमकं काय घडलं?
पीडितेची पती डॉक्टर असून, एका महिन्यापूर्वी महिलेच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल आला होता. कॉल करणाऱ्यानं स्वत:चे नाव विपिन सांगितलं. तसेच विदेशातून असल्याचं सांगितलं. सुरूवातीला त्यानं महिलेसोबत मैत्री केली. नंतर हळूहळू संवाद वाढत गेला. आरोपीनं महिलेकडून काही फोटो मागवले. नंतर महिलेचा विश्वास जिंकला.नंतर त्यानं महिलेला न्यूड व्हिडिओ पाठवण्यास सांगितले. भेटवस्तू पाठवण्याच्या बहाण्यानं त्यानं महिलेकडून आधार कार्डची कॉपी मागवली. नंतर पार्सल क्लीयरन्स, जीएसटी, डॉलर्स एक्सेंज, परमिट कार्ड आदी कारणे सांगून हप्त्याहप्त्यानं ३,७३ लाख रूपये उकळले. नंतर आणखी २.८५ रूपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास आरोपीनं व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.आरोपीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही आतंरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणारी टोळी असू शकते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सध्या तक्रारीनुसार, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
