Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त! सणासुदीत सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी खूशखबर, नवीन भाव जाहीर

Breaking News ! LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त! सणासुदीत सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी खूशखबर, नवीन भाव जाहीर
 

ऐन सणासुदीच्या काळात आणि महाराष्ट्रात महालक्ष्मी सण सुरु असतानाच एक मोठी खूशखबर मिळाली आहे, तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कमी केल्या आहे, त्यामुळे ग्राहकांना व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त मिळणार आहे. तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित करतात आणि सुधारीत दर जाहीर करतात. ताज्या मासिक सुधारणांनंतर देशभरातील व्यावसायिक ग्राहकांना या किमतीत कपातीचा दिलासा मिळाला आहे. नवीन किमती १ सप्टेंबरपासून लागू होतील.

सिलिंडरच्या किमती किती झाल्या कमी?

ऐन सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्याने हा एक मोठा दिलासा मानला जात आहे. मनी कंट्रोनुसार, ५१.५० रुपयांची कपात व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये झाली आहे.

किती रुपयांना मिळणार गॅस सिलिंडर?

१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत १ सप्टेंबरपासून १५८० रुपये असेल. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

कशा कमी होत गेल्या गॅस सिलिंडरच्या किमती?
१ ऑगस्ट २०२५ रोजी तेल विपणन कंपन्यांनी  १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ३३.५० रुपयांची कपात केली. दिल्लीत आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६३१.५० रुपये झाली आहे, जी आधी १६६५ रुपये होती. त्यापूर्वी, १ जुलै रोजी ओएमसींनी ५८.५० रुपयांची कपात केली होती.

यापूर्वी, जूनमध्ये, तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरसाठी २४ रुपयांची कपात जाहीर केली होती, ज्यामुळे दर १,७२३.५० रुपये झाला होता. एप्रिलमध्ये, किंमत १,७६२ रुपये होती. फेब्रुवारीमध्ये ७ रुपयांची थोडीशी कपात झाली, परंतु मार्चमध्ये ६ रुपयांची वाढ झाली आणि ती थोडीशी उलटली.
घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमधील फरक

घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर  हे दोन्ही एकाच प्रकारचे इंधन असले तरी, त्यांचा वापर, किंमत आणि इतर काही बाबींमध्ये मोठा फरक असतो. त्यांच्यातील मुख्य फरक खालीलप्रमाणे:

घरगुती सिलिंडर 

वापर: हा सिलिंडर प्रामुख्याने घरगुती वापरासाठी असतो, जसे की स्वयंपाक, गॅस हीटर किंवा ग्रामीण भागात दिव्यांसाठी.

आकार: घरगुती सिलिंडरचा आकार साधारणतः १४.२ किलो असतो.

अनुदान : घरगुती एलपीजी सिलिंडरवर सरकारकडून अनुदान दिले जाते, ज्यामुळे त्याची किंमत व्यावसायिक सिलिंडरपेक्षा कमी असते. हे सिलिंडर गॅस एजन्सी आणि डिलर्सकडून सहज उपलब्ध होतात आणि ग्राहक ऑनलाइन किंवा मोबाइल ॲपद्वारे ते बुक करू शकतात.

सुरक्षा: घरगुती वापरासाठी विशिष्ट सुरक्षा मानके पाळून हे सिलिंडर तयार केलेले असतात.

महत्त्वाचा नियम: व्यावसायिक कामांसाठी घरगुती सिलिंडर वापरण्यास सक्त मनाई आहे.

व्यावसायिक सिलिंडर
वापर: हा सिलिंडर फक्त व्यावसायिक कारणांसाठी वापरला जातो.

आकार: व्यावसायिक सिलिंडरचा आकार साधारणतः १९ किलो असतो.

उपयोग: हाॅटेल, मेस, विविध मिष्ठान्न आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो.

किंमत: व्यावसायिक सिलिंडरला कोणतेही सरकारी अनुदान मिळत नाही, त्यामुळे त्याची किंमत घरगुती सिलिंडरपेक्षा जास्त असते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.