Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

I LOVE YOU MOHAMMAD! काय आहे हा विवाद? जो कानपूरपासून सुरू झाला अन् महाराष्ट्रापर्यंत पोहोचला

I LOVE YOU MOHAMMAD! काय आहे हा विवाद? जो कानपूरपासून सुरू झाला अन् महाराष्ट्रापर्यंत पोहोचला
 

I Love Mohammad याची सर्वत्र चर्चा आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधून सुरू झालेला 'आय लव्ह मोहम्मद' नावाच्या पोस्टरचा वाद आता देशभरात पसरला आहे. या पोस्टरवरून झालेल्या राजकीय वाद-विवादानंतर अनेक राज्यांत हिंसक निदर्शनेही झाली.  हा वाद केवळ कानपूर आणि उन्नावपुरता मर्यादित न राहता, आता यूपीमधील भदोही आणि शाहजहांपूर, उत्तराखंडमधील ऊधमसिंह नगर, तसेच महाराष्ट्रातील ठाणे आणि लातूरपर्यंत पोहोचला आहे.

वादाची सुरुवात कधी आणि कशी झाली?
हा वाद 4 सप्टेंबर रोजी बारावफातच्या मिरवणुकीतून सुरू झाला. कानपूरमधील रावतपूरमध्ये परवानगीशिवाय एक मिरवणूक काढण्यात आली होती. याच वेळी रस्त्याच्या कडेला 'आय लव्ह मोहम्मद' लिहिलेले पोस्टर लावण्यात आले होते. दुसऱ्या समुदायाच्या लोकांनी याला 'नवीन प्रथा' म्हणत विरोध दर्शवला. पोलिसांनी परवानगी नसल्याने ते पोस्टर काढले. पोलिसांनी यावर गुन्हा दाखल केला. सुरुवातीला वातावरण शांत होते. परंतु काही राजकारण्यांच्या वक्तव्यांमुळे वाद वाढला आणि लोकांमध्ये संताप निर्माण झाला.

निदर्शने आणि हिंसा
 
कानपूरनंतर उन्नाव, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातही निदर्शने सुरू झाली. उन्नावमध्ये निदर्शकांनी दगडफेक केली. शिवाय पोलिसांच्या ताब्यातून दोन तरुणांना सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुस्लिम समाजाने एक मोठा मोर्चा काढला. ज्यात लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. निदर्शकांच्या हातात 'आय लव्ह मोहम्मद' लिहिलेले फलक होते. या मोर्चात प्रशासनाकडे तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची, अपमानास्पद वक्तव्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शिवाय धार्मिक भावनांचे संरक्षण करण्यासाठी कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनाही दिले.

पोलिसांचे स्पष्टीकरण
कानपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, हा गुन्हा पोस्टर लावल्याबद्दल नाही, तर परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याबद्दल आणि तंबू लावून 'नवीन प्रथा' सुरू केल्याबद्दल दाखल करण्यात आला आहे. मात्र, निदर्शकांचे म्हणणे आहे की, पैगंबर मोहम्मद यांचा अपमान ते कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाहीत. त्यातून हा वाद सुरू झाला आहे. तो देशातील प्रत्येक राज्यात पोहोचला आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी या विरोधात मुस्लीम समुदाय रस्त्यावर उतरला होता. शिवाय अनेक मुस्लीम तरुणांनीही आपलं स्टेटस I Love Mohammad ठेवल्याचं आढळून आलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.