Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टाटा ग्रुपमध्ये वाद! 157 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रस्टमध्ये दोन गट, काय आहे प्रकरण?

टाटा ग्रुपमध्ये वाद! 157 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रस्टमध्ये दोन गट, काय आहे प्रकरण?

भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक घराणं असलेल्या टाटा ग्रुपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला आहे. 157 वर्षांच्या इतिहासात कधी न घडलेलं दृश्य आज दिसत आहे.


परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की भारत सरकारलाच मध्यस्थी करण्यासाठी पुढे यावं लागलं. दोन केंद्रीय मंत्री लवकरच टाटा ग्रुपच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत, जेणेकरून मुख्य मालकी हक्क असलेल्या टाटा ट्रस्ट्समधील कलह शांत करता येईल.

वादाचं मूळ कारण काय आहे?

संघर्षामागचं प्रमुख कारण म्हणजे बोर्डवरील नियुक्त्या आणि 'टाटा सन्स'च्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या लिस्टिंग योजना. याच मुद्द्यांवरून ट्रस्टींमध्ये मतभेद वाढले आणि अखेर ट्रस्ट दोन गटात विभागला गेला.

गट 1 - समर्थक (नोएल टाटा गट):

नोएल टाटा

वेणू श्रीनिवासन

विजय सिंह (माजी नामनिर्देशित संचालक)

गट 2 - सुधारणावादी गट (बदल समर्थक):

मेहल मिस्त्री

प्रमित झावेरी

डेरियस खंबाटा

या गटाने विजय सिंह यांची पुन्हा नियुक्ती करण्यास विरोध केला आणि नवीन नामनिर्देशित संचालक नेमण्याची मागणी केली. त्यामुळे ट्रस्टमध्ये 3 विरुद्ध 4 अशा मतांचे विभाजन झाले.

वाद कोणत्या मुद्द्यावर?

टाटा सन्सला 'अप्पर-लेयर एनबीएफसी' म्हणून लिस्ट होण्यासाठी आरबीआयच्या डेडलाईनचा सामना करावा लागत आहे. मात्र, कंपनीने या लिस्टिंगपासून वाचण्यासाठी एनबीएफसी नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, शापूरजी पलोनजी ग्रुप (18.37 % हिस्सेदारी) बाजारात तरलता वाढवण्यासाठी लिस्टिंगची मागणी करत आहे.

सरकारची चिंता

या अंतर्गत कलहामुळे भारताच्या सर्वात महत्त्वाच्या उद्योग समूहाच्या गव्हर्नन्सवर परिणाम होऊ शकतो, हीच सरकारची मुख्य चिंता आहे.

एन. चंद्रशेखरन यांची भूमिका

'टाटा सन्स'चे चेअरमन एन. चंद्रशेखरन हे सध्या तटस्थ भूमिका घेत आहेत. त्यांना पुढील पाच वर्षांसाठी ट्रस्टींचं समर्थन आहे, तरीही ते सावध पावलं टाकत आहेत.

हे प्रकरण का महत्त्वाचं?

भारताच्या सर्वात प्रतिष्ठित उद्योग समूहात जर वाद झाले, तर रेग्युलेटर, गुंतवणूकदार आणि बाजाराचे लक्ष आपोआप तिकडे वळतं. हे फक्त बोर्डरूममधील मतभेद नाहीत, तर यावरूनच 'टाटा सन्स'ची लिस्टिंग आणि वारसा यांचा निर्णय होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.