Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

20 लाखांचे फर्निचर,75 हजारांचा शाॅवर; IAS तुकाराम मुंढेंचे 65 लाखांचे बीलं एका रात्रीत क्लिअर?

20 लाखांचे फर्निचर,75 हजारांचा शाॅवर; IAS तुकाराम मुंढेंचे 65 लाखांचे बीलं एका रात्रीत क्लिअर?
 

IAS अधिकारी तुकाराम मुंडे हे कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून परिचित आहेत. सध्या ते दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत. मलबार हिलमध्ये ज्या शासकीय निवासस्थानमध्ये ते राहतात. त्यासाठी रिनोवेशन  करण्यासाठी तब्बल 65 ते 70 लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा विषयीचे वृत्त 'इंडिया टुडे'च्या मराठी युट्यूब चॅनलने दिले आहे.

 
मुंढे मलबार हिल येथील सरकारच्या अंवती या बिल्डिंगमधील प्लॅटमध्ये राहण्यासाठी आहेत. तेथे येथे शिफ्ट झाल्यानंतर त्यांनी फ्लॅटचे रिनोवेशन केले. त्यासाठी तब्बल 65 ते 70 लाख रुपये खर्च झाला. या खर्चाचे बील त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आणि बांधकाम विभागाने देखील ते एका रात्रीत मंजुर केल्याचे वृत्तात म्हटले आहे.
 
फ्लॅटचे रिनोवेशन करताना 70 हजाराचा शाॅवर बसल्याचा तसेच 20 लाखांचे फर्निचर केल्याच्या पावत्या बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच किचनमध्ये बदल तसेच प्लास्टर करण्यासाठी, फर्शी बदलण्यासाठी देखील खर्च करण्यात आला आहे. दरम्यान, तुकाराम मुंढे यांची बदली होत असते ते एका जागी फार काळ राहत नाहीत त्यामुळे त्यांनी येवढा खर्च करणे आणि तो बांधकाम विभागाने मंजूर करणे योग्य नसल्याची टीका करण्यात येत आहे.
साडेनऊ कोटी खर्च

ज्या अवंती इमरातीमध्ये तुकाराम मुंढे हे सध्या राहत आहेत. त्या इमरातीच्या देखभाल दुरुस्तीसाठी चार वर्षापूर्वी साडेआठ ते साडेनऊ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. मलबार हिल या भागात असलेल्या या इमारतीमध्ये जवळ मंत्र्यांचे बंगले देखील आहेत. 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.