पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचतर्फे उपक्रम — १५०० हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग
सांगली, दि. ५ ऑक्टोबर : पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली “नमो रन मॅरेथॉन 2025 – नशा छोडो, राष्ट्र जोडो” हा उपक्रम सांगली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडला. या मॅरेथॉनचे आयोजन आमदार सुधीरदादा
गाडगीळ युवा मंच, सांगली जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले होते.
जिल्ह्यातील विविध भागांतील १५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत
व्यसनमुक्त, निरोगी आणि सशक्त भारत घडविण्याचा संकल्प केला. ‘नशा छोडो,
राष्ट्र जोडो — स्वस्थ भारत, सशक्त भारत!’ हा संदेश देत तरुणाईला
व्यसनमुक्त जीवनाकडे वळविणे आणि राष्ट्रप्रेम जागविणे हा या उपक्रमामागचा
प्रमुख उद्देश होता. स्पर्धकांनी उत्साह, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचे
उत्कृष्ट दर्शन घडवत मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली. या मॅरेथॉनच्या आयोजनासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेते :
मुलांमध्ये :१️ अभिनंदन दीपक सूर्यवंशी२️ आकारा बिरादार3 इराप्पा बेळगी४️ वैभव पवार५️ साहिल किरण साबळेउत्तेजनार्थ : सागर शर्मा, ऋषिकेश दादासो सरगर, तुकाराम विजय कुल्लाळकर, प्रतीक मारुती पाटील, श्रीधर कांबळेमुलींमध्ये :१️ प्रणाली नामदेव मंडले२️ तनुजा सचिन सोळांदूरकर३️ ऐश्वर्या दीपक धोत्रे४️ सुमित्रा रावसाहेब खंडागळे५️ आराध्या गणेश शिंदेउत्तेजनार्थ : आराध्या अमृत राजमाने, शीतल आप्पा पांढरे, सुहाना इरफान शेख, मयुरी संतोष राणे, अरीफा उमर शेखसर्व विजेत्यांना रोख रक्कम, शील्ड व प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ आलेल्या स्पर्धकांना शील्ड व प्रमाणपत्र, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की "या उपक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा आणि तरुणांना आरोग्य व राष्ट्रसेवेच्या दिशेने प्रेरित करण्याचा संदेश समाजात पोहोचला. या स्पर्धेसाठी मदत केलेल्या सर्व प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, पोलीस अधिकारी आणि आयोजकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो".यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैय्या पवार, भाजपा सांगली शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, सुनील भोसले, शैलेश पवार, विशाल पवार, शरद नलवडे, युवा मोर्चाचे शांतिनाथ कर्वे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश मोहिते, जिल्हा सचिव उदय मुळे, विजय साळुंखे, नितीन काका शिंदे, संदीप कुकडे, अतुल माने, गणपत साळुंखे, मंडलाध्यक्ष राहुल नवलाई, अमित देसाई, रवींद्र वादवणे, कृष्णा राठोड, संतोष सरगर, माजी नगरसेवक सुबराव मद्रासी, युवराज बावडेकर, राजेंद्र कुंभार, प्रसाद वळकुंडे, राजेश शहा, भैरवनाथ स्पोर्ट्स क्लबचे बामणे सर, चेतन माडगूळकर, प्रीती काळे, अश्विनी तारळेकर, श्रीधर जाधव, अनिकेत खिलारे, शुभम देसाई, कुणाल संकपाळ, संतोष घुणकी, तसेच भाजपा आणि युवा मंचचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, स्पर्धक व सांगलीकर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.