Big Breaking! वर्षावर रात्री खलबतं; राजकारणात मोठा भूकंप होणार! 'एवढे' माजी आमदार भाजपात जाणार, 'दादा'ला दे धक्का!
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील 'महायुती' आपले बळ वाढवण्यासाठी मोठी राजकीय खेळी करत असल्याचे वृत्त आहे. काल १६ ऑक्टोबर रोजी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या महत्त्वाच्या बैठकीत, चार माजी आमदारांना भाजपमध्ये आणण्याच्या अंतिम प्रस्तावावर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या
चार माजी आमदारांसह काही पक्षातील स्थानिक पातळीवरील नेते पदाधिकारी भाजप
प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात असून, लवकरच यावर शिक्कामोर्तब
होण्याची शक्यता आहे.
'वर्षा' बंगल्यावर प्रवेशाचे सूत्र ठरले?
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रभाव असलेल्या नेत्यांना भाजपमध्ये घेऊन स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) पकड कमकुवत करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे असेही सांगितले जात आहे.
हा चर्चेचा मुद्दा
या बैठकीत प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील नेतृत्वाचा विचार करण्यात आला, जेणेकरून माढा, मोहोळ आणि सोलापूर शहर परिसरातील भाजपची स्थिती अधिक मजबूत होईल. त्या चार माजी आमदारासंदर्भात आता चर्चा होत आहे. कोण आहेत ते चार माजी आमदार जाणून घेऊया.
संभाव्य प्रवेश करणाऱ्या नेत्यांची नावे आणि राजकीय पार्श्वभूमी
१.माजी आमदार राजन पाटील
हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघात त्यांचादबदबा असून सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकारणावर मजबूत पकड असलेले नेते ते आहेत. त्यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विश्वास होता, मात्र अलीकडील काळात ते अजित पवार गटात सक्रिय होते.
भाजपसाठी ते का महत्त्वाचे असू शकतात
राजन पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोहोळ आणि सोलापूर ग्रामीण भागात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, जिथे त्यांचा मोठा जनाधार आहे.
२. माजी आमदार यशवंत तात्या माने
हे सोलापूर परिसरातील एक महत्त्वाचा चेहरा आहे. त्यांचा स्थानिक राजकारणात मोठा अनुभव आहे.
भाजपसाठी महत्त्वाचे का?
यशवंत तात्या माने यांच्या प्रवेशामुळे सोलापूरच्या राजकारणात भाजपचा प्रभाव वाढू शकतो, तसेच आगामी काळात त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला घेता येईल.
३. माजी आमदार दिलीप माने
हे सोलापूर शहर (मध्य/उत्तर) परिसरात त्यांचा प्रभाव राहिला आहे. ते देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते होते.
भाजपसाठी ते का महत्त्वाचे
सोलापूर शहराच्या राजकारणात भाजपची स्थिती अधिक भक्कम करण्यासाठी आणि राष्ट्रवादीच्या वोट बँकेला धक्का देण्यासाठी यांचा प्रवेश महत्त्वाचा ठरू शकतो.
४. रणजीत शिंदे
हे माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र आहेत. बबनराव शिंदे यांचा माढा परिसरात मोठा प्रभाव आहे. ते रणजीत शिंदे यांच्या माध्यमातून भाजपला माढा मतदारसंघावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
भाजपसाठी महत्त्वाचे का?
माढा मतदारसंघावर नियंत्रण मिळवून या परिसरातील सहकारी आणि स्थानिक राजकारणात भाजपची पकड मजबूत करणे, हे भाजपचे ध्येय असू शकते.
भाजपची काय आहे चाल?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपची ही चाल पूर्णपणे स्थानिक आणि सहकारी स्तरावर विरोधी पक्षाला कमकुवत करण्याच्या दिशेने आहे. अजित पवार गटातील हे प्रमुख नेते भाजपमध्ये आल्यास आगामी निवडणुकीत 'महायुती'ला सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.