Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जतमधील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रात्रीत बदललं

जतमधील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रात्रीत बदललं
 

सांगली: जतमधील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञात सभासदांनी रात्रीत बदलल्याची माहिती समोर आली आहे. 'राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना'  असा नवीन फलक कारखान्याच्या कमानीवर लावला आहे. काही दिवसांपूर्वी जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा  यंदा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना दिला होता.

राजे विजयसिंह डफळे कोण?

राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थानाचे शेवटचे राजे होते (इ.स. १९२८-१९४८) आणि त्यांच्या नावाने अनेक संस्थांची स्थापना झाली आहे. यात प्रामुख्याने राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याचा  ही समावेश होता. राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना हा कारखाना जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कष्ट करून उभा केला होता.

कारखान्याचे नाव काही अज्ञात सभासदांनी रात्रीत बदलल्याची माहिती
राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री बदलल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर 'राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना' असा नवीन फलक लावण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून, हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला याचा तपास सुरू आहे.
राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही

जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही असा गर्भित इशारा काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी दिला होता. जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करू, प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं.

जयंत पाटील यांची कोंडी करण्याची भूमिका
जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या राजारामबापू साखर कारखान्याकडे जतचा साखर कारखाना आहे. कारखाना ढापण्यात आला असून तो सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे, अशी भूमिका आता गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजरामबापू साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा देत जयंत पाटील यांची कोंडी करण्याची भूमिका घेतली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.