इंदूर (मध्यप्रदेश): शाद सिद्दीकी नावाच्या मुसलमान तरुणाने सचिन हे हिंदु नाव धारण करून एका २६ वर्षीय हिंदु तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण केले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याची घटना येथे उघड झाली. तो मुसलमान असल्याचे समजल्यानंतर पीडित तरुणीने त्याला जाब विचारला असता त्याने 'मी 'मछली गँग'चा सदस्य आहे आणि हिंदु मुलींना गर्भवती करणे, ही माझी सवय आहे', अशा शब्दांत पीडितेला धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने पोलिसांकडे तक्रार केली आहे.
१. पीडित हिंदु तरुणी २ वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात भोपाळला आली होती. नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने शाद सिद्दीकीने स्वतःचे सचिन हे नाव सांगून तिच्याशी जवळीक केली. ती नंतर इंदूरला आली आणि खासगी आस्थापनात काम करू लागली. या काळात शाद सिद्दीकीचा तिच्याशी संपर्क चालूच होता.२. ३ जानेवारी २०२५ या दिवशी शाद सिद्दीकी इंदूरला आला आणि तरुणीच्या खोलीवर गेला. त्याने तिला 'माऊथ फ्रेशनर' दिले. ते घेताच तिला चक्कर आली आणि ती अर्धबेशुद्ध अवस्थेत पडली. या वेळी शादने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची छायाचित्रे काढली, तसेच व्हिडिओ बनवला. तरुणीने विरोध केल्यावर त्याने लवकरच लग्न करणार असल्याचे आश्वासन तिला दिले.३. काही दिवसांनी शादची खरी ओळख तिच्यासमोर आली. तिने त्याविषयी विचारले असता त्याने त्याचे खरे नाव सांगितले आणि 'पुढे एकत्र रहायचे असेल, तर धर्मांतर करावे लागेल', असे स्पष्ट केले. तो तिला सतत धमकावत होता. अनेकदा तिला फिरायला घेऊन जाऊन त्या वेळी तिला बुरखा घालायला भाग पाडत होता, असेही उघड झाले आहे.४. १ ऑक्टोबर २०२५ या दिवशी शाद पुन्हा इंदूरला आला आणि पीडित तरुणीला भेटला. त्याने तिच्याशी पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह धरला. त्यास तिने नकार दिल्यावर त्याने 'व्हिडिओ व्हायरल' करण्याची धमकी दिली.५. या सततच्या छळामुळे त्रस्त होऊन पीडित तरुणी 'करणी सेना' या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यालयात पोचली आणि संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र सिंह यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिने विजयनगर पोलिसांकडे अधिकृत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.