'कवठेमहांकाळमध्ये उपनिरीक्षक दादासाहेब खोत यांचा मृत्यू'; बेशुद्धावस्थेत आले आढळून, मंदिराजवळ नेमकं काय घडलं?
मिरज: सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील श्रेणी पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब महादेव खोत (वय ५५) हे कवठेमहांकाळमधील युवावाणी चौका परिसरातील मंदिराजवळ शनिवारी (ता. ११) रात्री बेशुद्धावस्थेत आढळून आले. नागरिकांनी तत्काळ त्यांना जवळच्या
उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित
केले. या मृत्यूची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे. त्यांच्या
पार्थिवावर मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
करण्यात आले आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दादासाहेब खोत हे सांगली जिल्हा पोलिस दलात श्रेणी पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते. ते कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात चार वर्षांपासून नेमणुकीस होते. काल रात्री ते कवठेमहांकाळ येथील एका मंदिराजवळ बेशुद्धावस्थेत मिळून आले. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, उपनिरीक्षक विनायक मसाळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी त्यांनी तपास सुरू केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.