मिरज : आजच्या काळात तंत्रज्ञान झपाट्याने प्रगत होत असताना राबणाऱ्या माणसाला त्याचा योग्य मोबदला मिळतो; मात्र पैसा आणि चंगळवाद वाढला असला तरी माणुसकी कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत समाजाकडून मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे मोठेपण श्री. बाळासाहेब सावंत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई यांनी काढले. ते स्मृतिशेष. नरसिंगा बाळू सावंत यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. देसाई म्हणाले की, "निसर्गाचा कोप वाढत असताना शेतकऱ्यांनी संघटित होऊन सामुदायिक शेती आणि पूर्वीच्या फडपद्धतीचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. तसेच नवतंत्रज्ञानाचा योग्य वापर करून तरुणांनी नवनवीन उद्योग सुरू करावेत आणि रोजगारनिर्मितीला चालना द्यावी." अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान श्री. शिवाजीराव इंगवले (बापू), श्री. दायाभाई पटेल, आणि श्री. शांतीलाल अर्जुन पटेल यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी सौ. रेश्मा सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्री. बालाजी सावंत यांनी त्यांच्या बालाजी मांडप डेकोरेटर्स' या फर्मच्या २०२५-२०३५ या कालावधीसाठीच्या Vision, Mission आणि Objectives विषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जयदीप जाधव यांनी केले. पाहुणे व मान्यवरांचे स्वागत संचालक श्री. अण्णासाहेब सावंत आणि श्री. कैलास सावंत यांनी केले.या कार्यक्रमाला सावंत कुटुंबीयांपैकी सौ. राजलक्ष्मी सावंत, सौ. अन्नपूर्णा जाधव, सौ. रेश्मा सावंत, श्री. बालाजी सावंत, श्री. कैलास सावंत, तसेच मराठा सेवा संघाचे शिवश्री अमृतराव सूर्यवंशी (तात्या), डॉ. संजय पाटील, श्री. धोंडिराम पाटील (संपादक सकाळ) आणि कोकणे गल्ली परिसरातील नागरिक उपस्थित होते. श्री. बाळासाहेब सावंत यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.