केंद्रीय निवडणूक आयोग देशभरात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिम राबवणार आहे. आज आयोगाने पत्रकार परिषद घेऊन याबाबत मोठी घोषणा केली. बिहारनंतर, मतदार यादी दुरुस्ती प्रक्रिया आता १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू होणार आहे. यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.
यासाठी आता मतदारांकडे काही कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने एसआयआरसाठी मतदारांनी सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांची यादी देखील जारी केली आहे. जर तुमच्याकडे ही कागदपत्रे असतील तर तुम्ही ती तुमच्या बीएलओला दाखवावीत. जे लोक ही कागदपत्रे सादर करू शकत नाहीत त्यांना एसआयआरनंतर तयार केलेल्या मतदार यादीत त्यांची नावांचा समावेश करण्यात अडचणी येऊ शकतात.
ही कागदपत्रे तुमच्याकडे असायला हवीत
केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले पेन्शन पेमेंट ऑर्डरसरकार किंवा स्थानिक संस्था, बँक, पोस्ट ऑफिस, एलआयसी यांनी जारी केलेले प्रमाणपत्रजन्म प्रमाणपत्रपासपोर्टशैक्षणिक प्रमाणपत्रकायमस्वरूपी निवास प्रमाणपत्रवन हक्क प्रमाणपत्रजातीचा दाखलाएनआरसीराज्य किंवा स्थानिक संस्थेने तयार केलेले कुटुंब नोंदणीजमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्रअसे आहे SIR चे वेळापत्रकमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी यावेळी वेळापत्रक स्पष्ट केले. SIR चा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होईल. छपाई आणि प्रशिक्षण २८ ऑक्टोबर २०२५ ते ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालेल. ४ नोव्हेंबर २०२५ ते ४ डिसेंबर २०२५ पर्यंत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा केली जाईल. ९ डिसेंबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी सादर केली जाणार आहे. बिहारमधील मतदार यादी दुरुस्ती प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. अंदाजे ७.४२ कोटी नावे असलेली अंतिम यादी ३० सप्टेंबर रोजी प्रकाशित झाली. बिहारमध्ये मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात होईल आणि १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.