सांगली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात गेल्या आठ दिवसांसून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. आठ, आठ दिवस सिलिंडरची नोंदणी करूनही गॅस मिळत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत
पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने तुटवडा जाणवत असल्याची माहिती गॅस एजन्सीच्यावतीने देण्यात आली. दिवाळीमुळे ग्राहक गेल्या पंधवड्यापासून अधिक प्रमाणात नोंदणी करीत आहेत. भिलवडी प्लांटमधून भारत आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपन्याकडून गॅस सिलिंडरचा कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. त्यातच मागणी वाढल्याने सध्या सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. ग्राहकांना यापूर्वी गॅस नोंदणीनंतर चार दिवसातच गॅस घर पोहोच होत होता. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून गॅस नोंदवून आठवडा उलटला तरी गॅस मिळत नाही. अनेक ठिकाणी ग्राहक जादा दराने काही गॅस सिलिंडर घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.