कर्ज प्रक्रिया
कर्ज प्रक्रियेत सुधारणा करून ती अधिक सोपी, पारदर्शक आणि ग्राहकांना अनुकूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नवा नियम
नव्या नियमांपैकी काही १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत, तर काही प्रस्तावांवर अजूनही चर्चा सुरू आहे.
EMI
या बदलांमुळे कर्ज घेणे सोपे होणार असून, सर्वसामान्य कर्जदारांना EMI मध्येही थेट फायदा होईल.
फ्लोटिंग रेट
फ्लोटिंग रेटवरील कर्ज घेतलेल्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
हप्ते कमी
आतापर्यंत बँका तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतरच हप्ते कमी करत असत, आता RBI ने या प्रक्रियेत बदल सुचवला आहे.
व्याजदर
कर्जदारांच्या EMI मध्ये व्याजदर कमी झाल्यास त्याचा फायदा लॉक-इन संपण्याआधीच मिळू शकतो.
ग्राहकांना दिलासा
लाखो गृहकर्ज किंवा इतर कर्ज घेतलेल्या ग्राहकांना थेट दिलासा मिळेल.
पर्याय
फिक्स्ड रेटवर कर्ज घेतलेल्यांनाही फ्लोटिंग रेटमध्ये स्विच करण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
सुविधा
हा पर्याय बँकांना बंधनकारक नसेल, पण बँका इच्छेनुसार ही सुविधा देऊ शकतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.