Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सतेज पाटलांच्या नव्या बॉम्बनं महायुतीत खळबळ; म्हणाले,'मुंबईतले प्रोजेक्ट एकाच माणसाला...'

सतेज पाटलांच्या नव्या बॉम्बनं महायुतीत खळबळ; म्हणाले,'मुंबईतले प्रोजेक्ट एकाच माणसाला...'
 

सरकार स्थापन करत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणताही दुजाभाव करणार नाही, अशी शपथ घेतात. मात्र, या शपथेला हरताळ फासण्याचे काम केलं आहे. आमचा आमदार नाही, त्या ठिकाणी निधी द्यायचा नाही. हा सरकारचा निर्णय योग्य नाही. मात्र, महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत, शेतकरी उध्वस्त झालेला आहे, नोकऱ्या नाहीत. त्यामुळे असे पैसे देऊन मत मिळणार नाहीत, अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आणि आमदार सतेज पाटील यांनी केली. ते कोल्हापुरात बोलत होते.

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणची निर्णय वेगवेगळे आहेत. स्थानिक पातळीवर निर्णय व्हावे अशी आमची अपेक्षा आहेत. निवडणुकीला अजून खूप वेळ आहे. त्यामुळे अनेक घडामोडी घडतील. अनेक ठिकाणी युती होईल, अनेक ठिकाणी स्वतंत्र लढावे लागेल. मात्र, महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे आमचं उद्दिष्ट आहे, असेही पाटील म्हणाले.


महायुतीमध्ये  देखील अनेक गट तट आहेत. मनसेबद्दल अजून चर्चा सुरू आहे. अधिकृत कोणताही निर्णय झालेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा एकत्र लढत होतो. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही वेगवेगळे लढत होतो. त्यामुळे आता देखील काही ठिकाणी आघाडी होईल काही ठिकाणी होणार नाही, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

भ्रष्टाचाराचा कळस या सरकारने गाठलेला आहे.रुग्णवाहिका असो किंवा औषध खरेदी असो सगळीकडे भ्रष्टाचार केला आहे. मुंबईतले प्रोजेक्ट एकाच माणसाला कसे काय दिले जात आहेत. महाराष्ट्र विकायचं काम हे सरकार करत आहे. रुग्णवाहिकेवरून आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर हल्लाबोल करतानाच शिवसेना व राष्ट्रवादीला सल्ला देत भाजपवर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना भाजपचा अनुभव येत आहे. सत्तेतील दोन्ही पक्ष संपवण्याचे काम भाजप करत आहे. भाजपला सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष हवे होते आता नको आहेत. कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी एफआरपीच्या मुद्द्यावर तोडगा काढावा. आम्ही सत्तेत असताना राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा करून तोडगा काढत होतो, असेही पाटील म्हणाले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.