देशभरात वाहतूक नियम कठोर करण्यात आले आहेत. रसत्यावर उभे असलेले वाहतूक पोलीस हेल्मेट न घालणे, वाहन परवाना नसलेल्यांवर कठोर कारवाई करतात. पण अनेकदा वाहतूक पोलीसच नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात याचे व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. ठाण्यातील असाच एक प्रकार समोर आलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ठाणे शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना कठोर कारवाई सुरु आहे. पोलिसांच्या या मोहिमेत एका तरुणाने वाहतूक पोलिसांची चूक शोधून काढली आणि त्यांच्यावरच बोट ठेवले. हेल्मेट न घालता स्कूटर चालवल्याबद्दल संबंधित तरुणाचे चालान कापण्यात आले होते. पण काही क्षणांतच त्या पोलिसाच्या दुचाकीची नंबर प्लेट अस्पष्ट असल्याचे त्याला दिसले. मग तरुणाने याचा व्हिडीओ बनवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ उडाला.ठाण्यातील एका रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी हेल्मेटशिवाय स्कूटर चालवणाऱ्या तरुणाला दंड ठोठावला. मात्र, चालान कापताच तरुणाने पोलिसांच्या दुचाकीची नंबर प्लेट गंजलेली आणि अस्पष्ट असल्याचे निदर्शनास आणले. "तुम्ही नियमांचे पालन का करत नाही?" असा थेट प्रश्न विचारून त्याने पोलिसांना थांबवले. सुरुवातीला पोलिसांनी 'कारवाईसाठी वाहन वापरत आहोत' असे समजावले, पण तपासात दुचाकी एका मित्राची असल्याचे समोर आले. तिच्यावर पोलिसांचा लोगो आणि चुकीची नंबर प्लेट लावण्यात आली होती.
तपास आणि कारवाईची सुरुवात
हा प्रकार वाहतूक पोलिस उपनिरीक्षक पंकज शिरसाट यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ तपास सुरू करून दुचाकीवरील बनावट लोगो आणि नंबर प्लेटचा घोटाळा उघड केला. पोलिसांच्या मित्राने नियम मोडले असल्याचे तक्रारीत नमूद झाले. या प्रकरणात दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा सर्व वाहनांवर कठोर कारवाई होईल, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. तरुणाच्या सतर्कतेमुळे हा घोटाळा बाहेर आला. ज्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी तरुणाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले आणि पोलिसांना विचारले, "नागरिकांना कडक नियम, पण स्वतःचं पालन का नाही?" या व्हिडिओमुळे नियम मोडणाऱ्या वाहतूक पोलिसांवर चाप बसेल, असेही काहींनी म्हटले.
वाहतूक विभागाची भूमिका
वाहतूक पोलिस विभागाने घटनेची गांभीर्य ओळखून सर्व बनावट लोगो आणि नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर शोधमोहीम सुरू केली आहे. पोलिस वाहनांवरही नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि कारवाईसाठी वापरल्या जाणाऱ्या दुचाकींची तपासणी केली जाईल, असे विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर विभागात आंतरिक तपास वाढवण्यात येणार आहे., जेणेकरून अशा चुकांची पुनरावृत्ती टाळता येईल. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या पोलिसांनी स्वत:च्या जबाबदाऱ्यांकडेही लक्ष ठेवायला हवे, हे यातून दिसले. तरुणाच्या एका साध्या निरीक्षणाने पोलिसांच्या मित्राच्या वाहनावर कारवाई झाली, ज्यामुळे सामान्य माणसाची ताकद दिसून आली.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत असताना, अंमलदारांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे मत सोशल मीडियात व्यक्त होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.